Posted inफायनान्स

UPI Down: पुन्हा एकदा PhonePe आणि Google Pay ठप्प, खरेदी करताना अडकला सारा देश!

शनिवारी पुन्हा एकदा यूपीआय व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्याचे दिसून आले. गुगल पे, फोनपे, आणि पेटीएमसारख्या लोकप्रिय अॅप्सद्वारे यूपीआय व्यवहार करणाऱ्या हजारो युजर्सना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागला. ‘डाऊन डिटेक्टर’ या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे २२०० पेक्षा जास्त तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. बहुतेक युजर्सनी पेमेंट फेल होण्याच्या तक्रारी केल्या, तसेच काहीजणांनी […]

Posted inफायनान्स

गुगलने पुन्हा एकदा नोकर कपात केली! या युनिट्समध्ये सर्वात मोठा फटका

गुगलने अलीकडेच घेतलेला निर्णय अनेक कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक ठरला आहे. अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल फोन आणि क्रोम ब्राउझरसारख्या महत्त्वाच्या युनिट्समधील शेकडो कर्मचाऱ्यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामुळे सुमारे २५,००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. नोकर कपात कोणत्या विभागात? गुगलच्या अँड्रॉइड, क्रोम, क्रोमओएस, पिक्सेल, फिटबिट, गुगल फोटोज, गुगल वन आणि नेस्ट यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या […]

Posted inफायनान्स

बजाज घराण्यात दुःखद घटना! मधुर बजाज यांचं निधन, उद्योगविश्वात शोककळा

मधुर बजाज हे बजाज ऑटोचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. त्यांनी २४ जानेवारी २०२४ रोजी आरोग्याच्या कारणास्तव या पदाचा राजीनामा दिला होता. केवळ बजाज ऑटोच नाही तर बजाज फायनान्स लिमिटेड, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि समूहातील इतर विविध कंपन्यांमध्येही त्यांनी संचालकपद भूषवले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बजाज समूहाने नव्या उंचीवर झेप घेतली. महाराष्ट्र स्कूटर लिमिटेडचे अध्यक्षपदही त्यांनी समर्थपणे सांभाळले […]

Posted inफायनान्स

ट्रम्पनं मैत्रीला लाथ मारली? ‘मला कशासाठीही मस्कची गरज नाही’ म्हणत टाकलं बाहेर!

डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या अमेरिकन राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. एकेकाळी एकमेकांचे समर्थक आणि सहकारी मानले गेलेले हे दोन दिग्गज आता वेगवेगळ्या विचारधारांच्या आणि निर्णयांच्या अडचणीत सापडले आहेत. ट्रम्प यांच्या एका व्हिडीओमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प म्हणताना दिसतात की, “मला इलॉन मस्कची […]

Posted inफायनान्स

५५ हजारांत सोनं घ्यायचं स्वप्न ठेवा बाजूला – आजचं नवं रेट ऐकून थक्क व्हाल!

११ एप्रिलच्या सकाळी सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना जबर धक्का बसला. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करण्याचं बेत आखणाऱ्या सर्वसामान्यांना आजचा दिवस महागडा ठरला. कारण सोन्याच्या किंमतीत एका झटक्यात तब्बल २९१३ रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, २४ कॅरेट सोन्याचा दर ९३,०७४ रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचला, जो आतापर्यंतचा एक उच्चांक मानला जातो. याच दरावर […]

Posted inफायनान्स

फक्त २००० रुपये दरमहा गुंतवा आणि बना कोट्यधीश! किती वर्षांत स्वप्न सत्यात उतरेल?

प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचं एक स्वप्न असतं—श्रीमंत होण्याचं. यासाठी तो आयुष्यभर मेहनत करत असतो, शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामधून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र केवळ मेहनतीने हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. उत्पन्नासोबत योग्य आणि शिस्तबद्ध गुंतवणूक देखील अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या मासिक उत्पन्नाचा एक ठराविक भाग अशी योजना निवडून गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जिथे वेळेनुसार […]

Posted inफायनान्स

महावीर ते गुड फ्रायडे… भारतीय शेअर बाजार ६ दिवस ‘सुट्टीवर’, गुंतवणूकदार काय करतील?

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी येत्या काही दिवसांत महत्त्वाचे बदल घडणार आहेत. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांत व्यापारासाठी तब्बल सहा दिवस बंद राहणार आहेत. हे बंद दिवस नियमित सुट्ट्यांबरोबरच सणांच्या सुट्ट्यांमुळे आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या ट्रेडिंग योजना आणि गुंतवणूक धोरणे आखताना या कालावधीचा विचार करणे अत्यंत आवश्यक […]