TVS iQube : देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. एकेकाळी आघाडीवर असलेली Ola Electric आता विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर घसरली असून, तिची बाजारातील पकड हळूहळू सैल होत चालली आहे. दुसरीकडे TVS Motor आणि Bajaj Auto यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी चुरशीची स्पर्धा सुरु आहे. यामध्ये TVS चा iQube स्कूटर आणि Bajaj चा Chetak हे मुख्य उत्पादने ठरत आहेत. मे 2025 मध्ये EV टू-व्हीलर विक्रीचा ट्रेंड पाहता, TVS सर्वाधिक वाहन नोंदणीसह आघाडीवर आहे.

26 मे 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, TVS Motor ने 19,451 युनिट्सची नोंदणी केली आहे, ज्यामुळे कंपनीचा बाजार हिस्सा 25% वर पोहोचला आहे. ही वाढ मे 2024 च्या तुलनेत लक्षणीय आहे, कारण त्यावेळी TVS चा हिस्सा फक्त 15.6% होता. एप्रिल 2025 मध्ये हा हिस्सा 22.3% होता, त्यामुळे महिन्यागणिक (MoM) वृद्धी देखील स्पष्ट दिसून येते.

Bajaj Auto-

Bajaj Auto ने देखील चांगली कामगिरी करत 17,167 युनिट्स विकल्या असून कंपनीचा मे 2025 मधील बाजार हिस्सा 22.6% झाला आहे. मे 2024 मध्ये हा हिस्सा 12.1% होता तर एप्रिल 2025 मध्ये तो 21.4% इतका होता. बजाजची Chetak इलेक्ट्रिक स्कूटर हे उत्पादन विक्रीच्या बाबतीत कंपनीचा कणा ठरत आहे. एप्रिल महिन्यात बजाजने नवीन Chetak 3503 मॉडेल लाँच केले होते, ज्याची किंमत ₹1.10 लाख असून ते 350 मालिकेतील सर्वात परवडणारे मॉडेल मानले जात आहे.

Ola Electric

Ola Electric ची मे 2025 मधील नोंदणी 15,221 युनिट्सवर स्थिरावली आहे. कंपनीचा सध्याचा बाजार हिस्सा 20% आहे, जो एप्रिल 2025 मध्ये 22.1% होता. मात्र, ओलाचा सर्वात मोठा धक्का म्हणजे मे 2024 मध्ये कंपनीचा हिस्सा तब्बल 49.2% होता. यामुळे एका वर्षात Ola च्या मार्केट डॉमिनन्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Ola ला मागे टाकण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांच्या विक्री आउटलेट्समध्ये व्यापार परवाना नसणे, उत्पादन गुणवत्तेची तक्रार, तसेच विक्रीनंतरच्या सेवेबाबत असलेली नकारात्मक प्रतिमा या सर्व गोष्टींनी ग्राहकांचा विश्वास डळमळीत केला आहे. त्यामुळे Ola Electric साठी पुन्हा ग्राहकांचा विश्वास कमावणे हे मोठे आव्हान ठरले आहे.

Ather Energy

चौथ्या स्थानावर असलेली Ather Energy ने मे महिन्यात 9,962 युनिट्सची नोंदणी केली. कंपनीचा बाजार हिस्सा सध्या 13.1% आहे, जो मे 2024 मध्ये 8.1% होता. मात्र, एप्रिल 2025 मध्ये 14.9% हिस्सा होता, त्यामुळे MoM टप्प्यावर थोडीशी घसरण झाली आहे.

Hero MotoCorp

आगामी काळात Hero MotoCorp कडून देखील मोठी उलथापालथ होऊ शकते. कंपनी त्यांची नवीन Vida VX2 श्रेणी बाजारात आणण्याच्या तयारीत आहे, जी तुलनेने परवडणारी असणार आहे. एप्रिल 2025 मध्ये Hero चा बाजार हिस्सा 7% होता आणि कंपनी पाचव्या स्थानावर होती.

मे 2025 मध्ये देशातील EV टू-व्हीलर बाजारात TVS नं.1 स्थानावर पोहोचला आहे, तर Bajaj चा झपाट्याने वाढता हिस्सा लक्षवेधी आहे. Ola च्या घसरणीने EV मार्केटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र झाली असून, आगामी काळात Hero च्या एंट्रीनंतर हे चित्र पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *