Top 5 Affordable Cars: मोठ्या कुटुंबासाठी कार खरेदी करताना 7-सीटर गाड्यांना प्राधान्य दिले जाते. भारतीय बाजारात या प्रकारच्या कार्सची मागणी सतत वाढत आहे. 15 लाखांच्या बजेटमध्येही अनेक परवडणाऱ्या, आरामदायी आणि पॉवरफुल 7-सीटर कार्स उपलब्ध आहेत. या गाड्यांमध्ये आरामदायी सीटिंगसोबतच चांगला मायलेज आणि आधुनिक तंत्रज्ञानही मिळते. चला तर मग, या बजेटमध्ये येणाऱ्या काही लोकप्रिय 7-सीटर कार्सची सविस्तर माहिती पाहूयात.
मारुती सुझुकी एर्टिगा
मारुती सुझुकी एर्टिगा ही 7-सीटर कार्समधील लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये 1462 सीसी इंजिन असून ते 101.64 बीएचपी पॉवर आणि 139 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. एर्टिगाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.96 लाख रुपये असून, टॉप व्हेरिएंटची किंमत 11.46 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार किफायतशीर असून कुटुंबासाठी आरामदायी आहे.
किआ कॅरेन्स क्लॅव्हिस
किआ कॅरेन्स क्लॅव्हिस ही लक्झरी आणि परवडणारी 7-सीटर कार आहे. यात 1497 सीसी इंजिन आहे, जे 157.57 बीएचपी पॉवर आणि 253 न्यूटन मीटर टॉर्क देते. या कारचा मायलेज 15.34 ते 19.54 किमी प्रति लिटर आहे. किआ कॅरेन्स क्लॅव्हिसची एक्स-शोरूम किंमत 11.50 लाख रुपये आहे. या कारमध्ये आधुनिक फीचर्स आणि आरामदायी आतील जागा आहे, ज्यामुळे ती मोठ्या कुटुंबासाठी योग्य पर्याय ठरते.
महिंद्रा स्कॉर्पिओ
महिंद्रा स्कॉर्पिओ हा दमदार 7-सीटर एसयूव्ही आहे ज्यामध्ये 2.1 लिटर इंजिन आहे. हे इंजिन 130 बीएचपी पॉवर आणि 300 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या कारचा मायलेज 14.44 किमी प्रति लिटरपर्यंत आहे. स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत 13.77 लाख रुपये असून, टॉप मॉडेलची किंमत 17.72 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारची मजबूत बांधणी आणि ऑफ-रोड क्षमता मोठ्या कुटुंबांसाठी विश्वासार्ह ठरते.
हुंडई अल्काझर
हुंडई अल्काझर ही 7-सीटर कार किंचित महाग आहे, पण फीचर्स आणि परफॉर्मन्समध्ये उत्कृष्ट आहे. यात 1493 सीसी इंजिन आहे जे 158 बीएचपी पॉवर आणि 253 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. अल्काझरचा मायलेज 17.5 ते 20.4 किमी प्रति लिटरपर्यंत आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे. आरामदायी सीटिंग आणि आधुनिक सुविधा यामुळे ही कार मोठ्या कुटुंबांसाठी चांगली निवड आहे.
महिंद्रा एक्सयूव्ही700
महिंद्रा एक्सयूव्ही700 हा सेगमेंटमधील लोकप्रिय 7-सीटर कार आहे, ज्यात 1999 सीसी ते 2198 सीसी इंजिनचे पर्याय आहेत. हे इंजिन 152 ते 197 बीएचपी पॉवर आणि 360 ते 450 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. एक्सयूव्ही700चा मायलेज 17 किमी प्रति लिटरपर्यंत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते. नवीन तंत्रज्ञान आणि आरामदायी डिझाइनमुळे ही कार मोठ्या कुटुंबांसाठी आदर्श आहे.
या सर्व पर्यायांमुळे 15 लाखांच्या बजेटमध्येही मोठ्या कुटुंबासाठी आरामदायी आणि पॉवरफुल 7-सीटर कार्स सहज खरेदी करता येतात.