स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एटीएम व्यवहारांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल देशभरातील सर्व खातेदारांवर लागू असणार आहेत, मग ते मेट्रो शहरात राहणारे असोत किंवा नॉन-मेट्रो भागात. नव्या नियमांनुसार, सर्व ग्राहकांना SBI च्या ATM मध्ये दर महिन्याला १० मोफत व्यवहार करता येतील. या व्यवहारांमध्ये रोख रक्कम काढणे, बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंट इत्यादीचा समावेश असतो.

याशिवाय, इतर बँकांच्या ATM चा वापर केल्यास सर्वसामान्य खातेदारांना दरमहा ५ मोफत व्यवहार करता येणार आहेत. हे व्यवहार फक्त त्या खातेदारांसाठी आहेत ज्यांचं मासिक सरासरी शिल्लक (Average Monthly Balance – AMB) २५,००० ते १,००,००० रुपये या रेंजमध्ये आहे. मात्र, जर खातेदाराचं AMB १,००,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर त्यांना एसबीआय आणि इतर बँकांच्या ATM वर अमर्यादित मोफत व्यवहार करण्याची मुभा मिळेल.

ATM सेवा शुल्कात झालेले बदल

मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर SBI कडून ग्राहकांना शुल्क आकारण्यात येणार आहे. जर तुम्ही SBI च्या ATM वर मोफत व्यवहारांची मर्यादा पूर्ण केल्यानंतर पुन्हा व्यवहार केला, तर प्रत्येक व्यवहारासाठी १५ रुपये + GST शुल्क आकारले जाईल. यामध्ये तुम्ही रोख रक्कम काढत असाल किंवा अन्य कोणताही व्यवहार करत असाल, शुल्क लागू होणार आहे.

इतर बँकांच्या ATM वर मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यावर, प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये + GST आकारले जातील. हे शुल्क केवळ रोख काढण्यापुरते मर्यादित नसून, काही सेवा जसे की मिनी स्टेटमेंट किंवा बॅलन्स इन्क्वायरी इत्यादीवर देखील लागू होऊ शकते, जर ते इतर बँकेच्या ATM वर केले गेले असतील.शिल्लक रक्कम नसल्याने व्यवहार फेल झाल्यास दंड

जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम नसेल आणि त्या कारणाने तुमचा ATM व्यवहार फेल झाला, तर SBI २० रुपये + GST शुल्क आकारेल. हा नियम ग्राहकांच्या निष्काळजी व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे.

नवीन दर १ मे २०२५ पासून लागू

SBI ने जाहीर केलं आहे की हे सर्व नवे दर आणि नियम १ मे २०२५ पासून लागू होतील. या तारखेनंतर जर तुम्ही तुमची मोफत मर्यादा ओलांडली आणि एटीएमद्वारे पैसे काढले, तर प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये पर्यंतचे शुल्क भरावे लागणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *