मॅकडोनाल्ड्सची जागतिक उपस्थिती आणि अपवादात्मक देश
मॅकडोनाल्ड्स (McDonald’s) ही जगातील सर्वात मोठी फास्ट-फूड रेस्टॉरंट चेनपैकी एक आहे. सध्या १०० हून अधिक देशांमध्ये ४०,००० पेक्षा जास्त मॅकडी रेस्टॉरंट्स सुरू आहेत. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये ही ब्रँड लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आजही जगातील अनेक देशांमध्ये मॅकडोनाल्ड्सचे एकही रेस्टॉरंट नाही?
मॅकडोनाल्ड्स नसलेल्या देशांची कारणे
मॅकडोनाल्ड्स नसण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. काही ठिकाणी राजकीय कारणांमुळे ब्रँडला प्रवेश नाकारण्यात आला आहे, तर काही ठिकाणी संस्कृती, स्थानिक खाद्यसंस्कृतीला दिलेले प्राधान्य, तसेच आर्थिक संकटे हे मुख्य कारण आहे. काही देशांनी ग्लोबल ब्रँडच्या विरोधात स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅकडीला परवानगी दिलेली नाही.
या देशांमध्ये मॅकडोनाल्ड्स नाही
१) झिम्बाब्वे – आर्थिक संकटामुळे बंद
मॅकडीने ८०-९० च्या दशकात आफ्रिकेतील झिम्बाब्वेमध्ये आपले रेस्टॉरंट सुरू केले. मात्र, लोकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ग्राहक कमी झाले आणि व्यवसाय टिकू शकला नाही. परिणामी, गेल्या २० वर्षांपासून झिम्बाब्वेमध्ये मॅकडी नाही.
२) रशिया – युद्धामुळे संपूर्ण एक्झिट
तीन वर्षांपूर्वी रशियात ८५० हून अधिक मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट्स चालू होती. मात्र, युक्रेनसोबतच्या युद्धानंतर मॅकडीने रशियातील संपूर्ण व्यवसाय विकला. त्यामुळे आता रशियामध्ये मॅकडी अस्तित्वात नाही.
३) आइसलँड – २००९ मधील आर्थिक संकट
आइसलँडमध्ये मॅकडीची ३ शाखा २००९ पर्यंत सुरू होत्या. मात्र, मोठ्या आर्थिक संकटामुळे कंपनीने संपूर्ण व्यवसाय बंद केला आणि पुन्हा कधीही परतले नाही.
४) नायजेरिया – स्थानिक उद्योग संरक्षणासाठी
नायजेरिया हा आफ्रिकेतील मोठा बाजार आहे, पण सरकारने स्थानिक खाद्य व्यवसायांना चालना देण्यासाठी मॅकडोनाल्ड्सच्या प्रवेशास परवानगी दिली नाही.
५) मंगोलिया आणि कंबोडिया – सांस्कृतिक आणि आर्थिक कारणे
हे आशियाई देश स्वतःच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीला जास्त महत्त्व देतात, त्यामुळे मॅकडोनाल्ड्सची गरज इथल्या नागरिकांना कधीच वाटली नाही.
६) मॅसेडोनिया – सतत तोट्यामुळे बंद
दक्षिण-पूर्व युरोपातील मॅसेडोनियामध्ये २०१३ पर्यंत मॅकडी होते, पण सतत तोटा होऊ लागल्यामुळे सर्व रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली.
७) क्युबा, इराण आणि उत्तर कोरिया – राजकीय निर्बंध
क्युबा, इराण आणि उत्तर कोरियामध्ये अमेरिकन कंपन्यांवर कडक निर्बंध असल्याने मॅकडीला परवानगी नाही.
मॅकडोनाल्ड्स नसलेल्या इतर देशांची यादी:
याव्यतिरिक्त, खालील देशांमध्ये देखील मॅकडोनाल्ड्स नाही:
🔹 अफगाणिस्तान
🔹 बोलिव्हिया
🔹 घाना
🔹 लाओस
🔹 येमेन
🔹 जमैका
🔹 मालदीव
🔹 बार्बाडोस
🔹 आर्मेनिया
🔹 टोंगा
🔹 बांगलादेश
🔹 इराक
🔹 नेपाळ
🔹 ट्युनिशिया
🔹 कझाकिस्तान
🔹 सिसिली
🔹 बेलारूस