भारतीय अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक क्षण घडला – सोन्याचा दर प्रथमच ₹1 लाख प्रति १० ग्रॅमच्या वर गेला! अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ही झपाट्याने झालेली वाढ केवळ गुंतवणूकदारांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला अर्थपूर्ण संकेत देते. याच पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीचे बँकर उदय कोटक यांनी भारतीय महिलांबाबत केलेली टिप्पणी विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली.
“भारतीय महिला – जगातील सर्वोत्कृष्ट फंड मॅनेजर” – उदय कोटक
उदय कोटक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचा Twitter) वर लिहिलं:
“भारतीय गृहिणी या जगातील सर्वात हुशार फंड मॅनेजर आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासाठी सोनं साठवून ठेवलेलं आहे – आणि सोन्याच्या वाढत्या किमती हे त्यांच्या दीर्घदृष्टीचं प्रतिक आहे.”
कोटक यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की, बँका, अर्थतज्ज्ञ आणि सरकारने देखील भारतीय कुटुंबांची गुंतवणुकीची शिस्त आणि संयम शिकावा – विशेषतः गृहिणींकडून!
भारतातील महिलांकडे जगातील सर्वाधिक सोनं
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार:
-
भारतीय महिलांकडे २४,००० ते २५,००० टन सोनं आहे.
-
हे जगातील एकूण सोन्याच्या साठ्याच्या सुमारे ११% आहे.
-
तुलना:
-
अमेरिका – ८,१३३ टन
-
जर्मनी – ३,३५२ टन
-
आयएमएफ – २,८१४ टन
-
इटली – २,४५१ टन
-
फ्रान्स – २,४३६ टन
-
या सर्वांचा एकत्रित साठा जरी केला, तरीही भारतीय कुटुंबांकडे असलेलं सोनं त्यापेक्षा जास्त आहे!
दक्षिण भारत – देशातील ‘गोल्डन बेल्ट’
-
देशातील ४०% सोनं दक्षिण भारतात आहे.
-
त्यात एकट्या तामिळनाडूचं २८% योगदान आहे.
-
सांस्कृतिक दृष्टिकोनातून, सोनं हा केवळ दागिन्यांचा भाग नसून धन, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेचं प्रतिक आहे.
सोन्याच्या किमतीत वाढ का?
-
अक्षय्य तृतीयेचा सण – सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त.
-
जागतिक स्तरावर राजकीय अस्थिरता, चलनवाढ, डॉलरवरील विश्वासघात यामुळे सोन्यात मोठी गुंतवणूक.
-
कॉमेक्स गोल्ड $3400 च्या पातळीवर.
-
एमसीएक्स गोल्ड ₹९८,७५३ पर्यंत गेला (GST वगळून).