Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडून नका, फायदा घेऊन झटपट पोर्टफोलिओ भक्कम करा
धनलक्ष्मी रोटो स्पिनर्स देणार फ्री बोनस शेअर्स
गुंतवणूकदारांसाठी ही आठवडा सुवर्णसंधी घेऊन येत आहे. शेअर बाजारात काही कंपन्या आपले शेअर्स ‘एक्स-बोनस’ म्हणून लिस्ट करण्याच्या तयारीत आहेत. याच यादीत धनलक्ष्मी रोटो स्पिनर्स या कंपनीचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना एका शेअरसाठी मोफत आणखी एक शेअर बोनस स्वरूपात दिला जाणार आहे. त्यामुळे कमी गुंतवणुकीत दुप्पट शेअर्स मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे.
बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट आणि खरेदीची अंतिम संधी
धनलक्ष्मी रोटो स्पिनर्सने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, बोनस शेअर्ससाठी 26 मार्च 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ, या तारखेच्या आधी जर गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स विकत घेतले असतील, तर त्यांना बोनस शेअर्स मिळणार आहेत. 26 मार्चनंतर कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड होतील. विशेष म्हणजे, कंपनी पहिल्यांदाच एक्स-बोनस ट्रेडिंगसाठी पुढे येत आहे.
लाभांश देण्यातही कंपनी आघाडीवर
धनलक्ष्मी रोटो स्पिनर्सने लाभांश वितरणाच्या बाबतीत सातत्य दाखवले आहे. 2022 मध्ये कंपनीने एका शेअरवर 1 रुपया लाभांश दिला होता. 2023 मध्ये हा लाभांश वाढवून 1.25 रुपये करण्यात आला. तर 2024 मध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना 1.50 रुपयांचा लाभांश दिला आहे. यावरून स्पष्ट होते की, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांचा फायदा लक्षात घेऊन निर्णय घेत असते.
शेअर बाजारातील कामगिरी भक्कम आणि स्थिर
शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये 3.46 टक्क्यांची वाढ झाली आणि त्याची किंमत 251.30 रुपयांपर्यंत पोहोचली. मागील एका आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 19 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एका वर्षाच्या कालावधीत या स्टॉकने 39 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. अशा प्रकारच्या स्थिर आणि वृद्धिंगत कामगिरीमुळे अनेक गुंतवणूकदार या स्टॉककडे आकर्षित होत आहेत.
तांत्रिक स्थिती आणि भागधारकांची रचना
तज्ञांच्या माहितीनुसार, कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 289 रुपये असून नीचांक 147 रुपये आहे. सध्याचा मार्केट कॅप 98.01 कोटी रुपये आहे. प्रमोटरकडे 47.64 टक्के हिस्सेदारी आहे, तर उर्वरित 52.36 टक्के हिस्सा सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे आहे. कंपनीची ही भागधारक रचना विश्वासार्हता वाढवणारी आहे.