JioHotstar वर मोफत पाहा IPL 2025 चा संपूर्ण सीजन, जिओनं आणली धमाकेदार ऑफर

मोफत आयपीएलचा आनंद

आयपीएल हा क्रिकेट चाहत्यांसाठी सणासारखा असतो आणि यंदाच्या २०२५ हंगामासाठी जिओनं भन्नाट ऑफर आणली आहे. जिओचे विद्यमान आणि नवीन ग्राहक केवळ २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करून संपूर्ण हंगाम मोफत पाहू शकणार आहेत. यामध्ये ९० दिवसांचे JioHotstar सब्सक्रिप्शन आणि ५० दिवसांसाठी JioFiber किंवा AirFiber मोफत मिळेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आता कोणताही अतिरिक्त खर्च न करता सामना पाहता येणार आहे.

४के क्वालिटीत सामने पाहण्याची संधी

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी १७ मार्च ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत नवीन जिओ सिम खरेदी करणे किंवा आपल्या विद्यमान जिओ क्रमांकावर २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करणे आवश्यक आहे. जिओच्या माहितीनुसार, या अनलिमिटेड क्रिकेट ऑफरअंतर्गत ग्राहकांना ९० दिवसांसाठी JioHotstar मोफत मिळेल आणि ते ४के क्वालिटीपर्यंत ऑनलाइन सामने पाहू शकतील.

मोफत JioFiber आणि AirFiber ट्रायल

याशिवाय, रिलायन्स जिओ ५० दिवसांसाठी JioFiber किंवा Jio AirFiber चे मोफत ट्रायल कनेक्शन देत आहे. यामध्ये ८०० हून अधिक टीव्ही चॅनेल, ११ पेक्षा जास्त ओटीटी अॅप्स आणि अमर्यादित वाय-फाय अॅक्सेसचा समावेश आहे. त्यामुळे केवळ मोबाईलवर नाही तर मोठ्या स्क्रीनवरही संपूर्ण कुटुंबासोबत सामना पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

आणखी काही स्वस्त डेटा प्लॅन

जिओने ग्राहकांसाठी स्वस्त डेटा प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत.

  • २५ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळतो.
  • ६१ रुपयांच्या प्लानमध्ये ६ जीबी डेटा मिळतो आणि त्याची वैधता सध्याच्या प्लानइतकीच आहे.
  • १२१ रुपयांच्या प्लानमध्ये १२ जीबी डेटा मिळतो आणि त्याची वैधता देखील सध्याच्या प्लानइतकीच आहे.

कुठून खरेदी कराल?

हे सर्व प्लॅन्स मायजिओ अॅप, जिओची अधिकृत वेबसाइट (www.jio.com), तसेच पेटीएम, गुगल पे, फोनपे सारख्या अॅप्सवरून सहज रिचार्ज करता येतील. त्यामुळे यंदाच्या आयपीएलसाठी कोणतीही अडचण येणार नाही आणि सामना पाहण्याचा आनंद अखंडित राहील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *