जर तुम्ही नियमितपणे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल, तर केंद्र सरकारने तुमच्यासाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून FASTag Annual Pass लाँच करण्यात येत आहे, ज्यामुळे टोल देण्याची झंझट कमी होणार आहे.
फक्त ₹३,०००मध्ये संपूर्ण वर्षासाठी टोलमुक्त प्रवास!
या नव्या वार्षिक टोल पाससाठी केवळ ₹३,००० भरावे लागतील. एकदा हा पास घेतल्यानंतर तुम्हाला खालीलपैकी जे आधी पूर्ण होईल त्या आधारावर लाभ मिळेल:
-
२०० टोलमुक्त ट्रिप्स
-
१२ महिन्यांचा कालावधी
यामुळे दरवेळी टोल देण्यासाठी FASTag रिचार्ज करणे आवश्यक न राहता, निश्चित दरात वर्षभरासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे धोरण विशेषतः अशा प्रवाशांसाठी फायदेशीर आहे, जे वारंवार महामार्गांचा वापर करतात—जसे की ऑफिस कम्युटर्स, पर्यटनप्रेमी किंवा लांब अंतराच्या प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर करणारे नागरिक.
कौन पात्र आहे? कोण नाही?
हा पास फक्त खाजगी चारचाकी वाहनांसाठी लागू आहे:
✅ पात्र वाहनं:
-
खाजगी कार
-
जीप
-
व्हॅन
❌ अपात्र वाहनं:
-
व्यावसायिक वाहने (उदा. ट्रक, टेम्पो, कमर्शियल व्हॅन्स)
-
प्रवासी वाहतूक करणारी व्यावसायिक वाहने
महत्त्वाची अट: हा पास केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत येणाऱ्या टोल प्लाझांसाठी वैध असेल. राज्य महामार्ग किंवा स्थानिक पातळीवरील टोल रस्त्यांवर हा पास लागू होणार नाही.
पास कसा मिळवायचा? प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन
वार्षिक टोल पास मिळवण्यासाठी तुम्हाला काही सोप्या पायऱ्या पार पाडाव्या लागतील:
-
FASTag आवश्यक:
तुमच्या कार/जीप/व्हॅनसाठी FASTag आधीच सक्रिय आणि वैध असणे गरजेचे आहे. -
खरेदी प्लॅटफॉर्म:
-
‘राजमार्ग यात्रा’ (Rajmarg Yatra) मोबाइल अॅप
-
NHAI ची अधिकृत वेबसाईट: www.nhai.gov.in
-
-
पेमेंट प्रक्रिया:
₹३,००० ची रक्कम FASTag शी संलग्न बँक खात्यामधून किंवा FASTag वॉलेटमधून भरावी लागेल. -
पासची अॅक्टिव्हेशन:
यशस्वी पेमेंट आणि पडताळणी झाल्यानंतर, हा पास FASTag प्रणालीशी लिंक होईल आणि १५ ऑगस्ट २०२५ पासून तो सक्रिय होईल.