Tata Harrier EV: टाटा मोटर्सने आज 3 जून 2025 रोजी भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठी घोषणा करत आपली प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘टाटा हॅरियर ईव्ही’ लाँच केली. आकर्षक डिझाईन, दमदार बॅटरी, प्रगत वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट रेंज यामुळे ही एसयूव्ही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
रेंज आणि चार्जिंग क्षमता
या नव्या हॅरियर ईव्हीमध्ये कंपनीने 65 kWh आणि 75 kWh अशा दोन बॅटरी पर्याय दिले आहेत. यामुळे ही कार 627 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते, जी सध्या इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक महत्त्वाची कामगिरी आहे. 120 kW फास्ट चार्जिंगद्वारे ही एसयूव्ही केवळ 25 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज होते. विशेष म्हणजे 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 250 किलोमीटरची रेंज मिळू शकते.
हॅरियर ईव्हीमध्ये ड्युअल मोटर सेटअप असून ती 238 PS पॉवर आणि 504 Nm टॉर्क निर्माण करते. ही एसयूव्ही केवळ 6.3 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितासचा वेग पकडू शकते. बॅटरीचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी प्रगत कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. यासह अल्ट्रा ग्लाइड सस्पेन्शन आणि क्यूडब्ल्यूडी टेक्नॉलॉजीमुळे कोणत्याही रस्त्यावर ती आरामात चालवता येते.
हॅरियर ईव्हीची वैशिष्ट्ये
हॅरियर ईव्हीमध्ये असंख्य प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. यात ड्युअल टोन इंटीरियर, पॅनोरॅमिक सनरूफ, 36.9 सेमी QLED इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल झोन टेम्परेचर कंट्रोल, अँबियंट लाइट्स, ऑटो पार्क सिस्टीम, फोन अॅक्सेससह कीलेस एंट्री, 540 डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा आणि ई-IRVM यांचा समावेश आहे.
साउंड सिस्टमसाठी JBL ऑडिओ देण्यात आले असून, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह 6 वेगवेगळे टेरेन मोड्स – Normal, Mud, Rock Crawl, Sand, Snow/Grass आणि Custom – दिले आहेत. तसेच या गाडीत Level-2 ADAS अंतर्गत 22 सेफ्टी फीचर्स दिले गेले आहेत. हॅरियर ईव्हीमध्ये OTA अपडेट्स, इन-कार पेमेंट, V2L, V2V आणि 25 पेक्षा अधिक अॅप्ससह आर्केड फीचरही उपलब्ध आहे. 4 वर्षांपर्यंत कनेक्टेड कार फीचर्स दिले जातील.
बूट स्पेसच्या बाबतीत ही एसयूव्ही 502 लिटरपासून 999 लिटरपर्यंतचा स्पेस देते. तसेच, फ्रंट पॉवर्ड सीट्स, पॉवर बॉस मोड आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्ससारखे प्रीमियम फीचर्सही या गाडीत आहेत.
किंमत किती?
हॅरियर ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 21.49 लाख रुपयांपासून सुरू होते. ही एसयूव्ही 4 रंगांमध्ये उपलब्ध असून स्टील्थ एडिशनही ग्राहकांसाठी देण्यात आले आहे. क्वाड डे 13 आणि 14 जून रोजी होणार असून अधिकृत बुकिंग 2 जुलै 2025 पासून सुरू होईल. कंपनी हॅरियर ईव्हीला लाईफटाईम बॅटरी वॉरंटी देत आहे, जे ग्राहकांसाठी एक मोठा फायदा ठरतो.
भारतीय बाजारात हॅरियर ईव्हीचे थेट स्पर्धक म्हणजे Mahindra BE.06, Mahindra XUV.e9 आणि BYD Atto 3. या सर्व गाड्या हॅरियर ईव्हीला कडवी टक्कर देतील, मात्र टाटाचे मजबूत ब्रँड व्हॅल्यू आणि फीचर्स यामुळे हॅरियर ईव्हीला स्पर्धेत महत्त्वाचे स्थान मिळू शकते.