EPFO Retirement Planning: जरी आपली मासिक पगाररचना मर्यादित असली तरी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही योजना आपल्या निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी जीवन जगण्यासाठी एक ठोस आधार ठरू शकते. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीने EPFद्वारे आपण २ कोटींपेक्षा अधिक निधी उभारू शकतो. खाली दिलेल्या उदाहरणाद्वारे पाहूया ही प्रक्रिया कशी कार्य करते.
EPF म्हणजे काय आणि याचा फायदा कसा?
EPF ही केंद्र सरकारच्या अंतर्गत सुरू असलेली एक निवृत्ती-आधारित योजना आहे. खासगी किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांच्या पगारातून ठराविक टक्केवारी दरम्यान रक्कम आपोआप वळती जाते. ही रक्कम दीर्घकाळात चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते, ज्यामुळे एक मोठा फंड तयार होतो.
उदाहरण आधारित गणना: ₹३०,००० पगार + EPF योगदान
-
वय: २५ वर्षे
-
निवृत्ती वय: ६० वर्षे (35 वर्षांची सेवा)
-
मासिक मूळ पगार: ₹३०,०००
-
EPF कर्मचारी योगदान: १२%
-
EPF नियोक्ता योगदान: ३.६७%
-
वार्षिक पगारवाढ: ५% (गृहीत)
-
EPF व्याजदर: ८.२५% (सध्याच्या दरानुसार)
अंतिम निधी कसा तयार होतो?
वरील गृहितकांनुसार, जर तुम्ही ३५ वर्षांपर्यंत नियमितपणे EPFमध्ये पैसे गुंतवले आणि कोणताही आंतरकालीन विड्रॉवल केला नाही, तर तुमचं एकूण स्वतःचं योगदान ₹५४,०६,१६८ इतकं होईल. त्यावर चक्रवाढ व्याज ₹१,६३,१८,५६९ इतकं जमा होईल. परिणामी, तुमचा एकूण निवृत्ती फंड ₹२,१७,२४,७३७ इतका होईल — म्हणजेच २ कोटींहून अधिक!
कमी पगारातही मोठा फंड कसा शक्य?
हे उदाहरण दाखवून देतं की, सुरुवातीचा पगार कमी असतानाही, EPFमध्ये सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर मोठा फंड उभारणे शक्य आहे. यामध्ये व्याज चक्रवाढ स्वरूपात मिळत असल्याने, प्रत्येक वर्षाच्या व्याजावर पुढील वर्षी आणखी व्याज बसत जातं – आणि हीच गोष्ट दीर्घकालीन गुंतवणुकीला सामर्थ्य देते.
EPF फायदे आणि काही महत्त्वाचे टिप्स:
-
सुरक्षिततेस प्राधान्य – EPF ही सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणूक सुरक्षित आणि नियमित परतावा मिळवून देते.
-
करसवलत – आयकर कायद्यानुसार EPFवर टॅक्स सवलत देखील मिळते (EEE श्रेणी).
-
नोकर बदलला तरी खातं जपत रहा – EPF खातं ट्रान्सफर करून एकाच UAN क्रमांकाखाली ठेवावं.
-
पैसे काढण्याची सवय टाळा – निधी कमी होतो आणि चक्रवाढीचा परिणामही कमी होतो.
-
EPFO पोर्टलवर नियमित तपासणी – तुमच्या खात्यातील योगदान व व्याज वेळोवेळी तपासणं गरजेचं आहे.