जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि जोखमीपासून बचाव करायचा असेल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक विश्वासार्ह आणि हमी परतावा देणारी योजना आहे. बाजाराच्या चढ-उतारांवर अवलंबून न राहता, ही योजना सुरक्षित आणि चक्रवाढ व्याजामुळे धनसंचयासाठी उपयुक्त ठरते.
PPF का निवडावी?
PPF ही केंद्र सरकारची हमी योजना आहे आणि सध्या या योजनेवर ७.१% वार्षिक व्याज दिलं जातं. यात गुंतवणूक केलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम पूर्णतः करमुक्त (EEE श्रेणी) असते. त्यामुळे ही योजना केवळ सुरक्षित नाही, तर कर-बचतीचं उत्तम साधनही आहे.
पती-पत्नी मिळून कसे उभारू शकतात ३ कोटींहून अधिक संपत्ती?
PPF संदर्भात एक नियम आहे – एका व्यक्तीच्या नावावर फक्त एकच खाती उघडता येते. यामध्ये संयुक्त खाती परवान्याची नाहीत. मात्र, पती आणि पत्नी दोघेही स्वतंत्र खाते उघडू शकतात. जर दोघांनीही वार्षिक ₹१.५ लाख या कमाल मर्यादेप्रमाणे PPFमध्ये गुंतवणूक सुरू ठेवली, तर ३० वर्षांनंतर आश्चर्यकारक रक्कम जमा होऊ शकते.
गणित समजून घ्या:
-
गुंतवणूक कालावधी: १५ वर्षांची मूळ मॅच्युरिटी + १५ वर्षांचा विस्तार (५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये)
-
दर वर्षी गुंतवणूक: प्रत्येकी ₹१.५ लाख
-
एकूण कालावधी: ३० वर्षे
-
व्याजदर (सद्य स्थिती): ७.१% (सरासरी)
या गणनेनुसार, प्रत्येक व्यक्तीला सुमारे ₹१.५४ कोटी मिळू शकतात. म्हणजेच दोघांनी मिळून सुमारे ₹३.०९ कोटी इतकी सुरक्षित आणि करमुक्त रक्कम ३० वर्षांनंतर हातात येते.
एक्स्टेंशन प्रक्रिया – काय काळजी घ्यावी?
PPFचे मॅच्युरिटी नंतर विस्तार करायचा असल्यास, खातेदाराला आपली बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत एक फॉर्म-H सादर करावा लागतो. हा अर्ज मूळ मॅच्युरिटीच्या तारखेपासून १ वर्षाच्या आत द्यावा लागतो. जर अर्ज वेळेवर सादर केला नाही, तर खात्यात नवी गुंतवणूक करता येणार नाही. त्यामुळे योग्य नियोजन आणि वेळेचे पालन आवश्यक आहे.
करबचतीचा अजून एक फायदा
PPF ही EEE (Exempt-Exempt-Exempt) वर्गवारीत येणारी योजना आहे:
-
गुंतवणुकीसाठी कलम ८०सी अंतर्गत ₹१.५ लाखांपर्यंत सूट
-
मिळालेलं व्याज करमुक्त
-
मॅच्युरिटीची रक्कमही करमुक्त