EPFO अपडेट – आता ५ लाख रुपये ऑटो-क्लेमशिवाय मिळणार!
जर तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ कपात होत असेल, तर ही महत्त्वाची बातमी आहे! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नवीन नियम लागू करत ऑटो-क्लेम मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली आहे.
EPFO ऑटो-क्लेममध्ये काय बदल झाले?
पूर्वी ऑटो-क्लेम मर्यादा ₹१ लाख होती, जी आता ₹५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
कोणत्याही कागदपत्रांशिवाय पीएफ क्लेम करता येईल.
पूर्वी जिथे १० दिवस लागायचे, तिथे आता केवळ ३-४ दिवसांत क्लेम प्रक्रिया पूर्ण होणार.
याआधी ही सुविधा फक्त आजारपण व हॉस्पिटल खर्चासाठी होती, पण आता लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठीही पीएफ ऑटो-क्लेम करता येईल.
UPI आणि ATM वरून थेट PF काढता येणार!
मे-जून २०२५ पासून EPFO सदस्य UPI आणि ATM च्या मदतीने थेट पीएफ काढू शकतील.
तुम्ही केवळ बॅलन्स पाहू शकणार नाही, तर तुमच्या आवडत्या बँकेत पीएफचे पैसे ट्रान्सफरही करू शकणार!
मागील ५ वर्षांत ऑटो-क्लेम मर्यादा कशी वाढली?
17 एप्रिल २०२० – सुरुवातीला ₹५०,००० ची मर्यादा
17 मे २०२४ – मर्यादा ₹१ लाख करण्यात आली
17 एप्रिल २०२५ – ₹५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली
फायदा काय?
जलद प्रक्रिया – फक्त ३-४ दिवसांत पैसे खात्यात जमा
कागदपत्रांची गरज नाही – सुलभ आणि सोपी प्रक्रिया
UPI आणि ATM सुविधेचा लाभ
EPFO च्या या मोठ्या निर्णयामुळे करोडो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे!