एलआयसीची ‘जीवन शिरोमणी’ योजना उच्च उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आलेली एक खास विमा बचत योजना आहे. या पॉलिसीचं खास वैशिष्ट्य म्हणजे फक्त ४ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो, आणि त्यानंतर विमाधारकास किमान १ कोटी रुपयांची विमा रक्कम हमी दिली जाते. योजनेचा उद्देश आहे गुंतवणुकीसोबत विमा संरक्षणाची निश्चितता देणं.

योजनेची रचना: मनी बॅकसह विमा कवच

‘जीवन शिरोमणी’ ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा बचत योजना आहे. यामध्ये वेळोवेळी ठराविक टप्प्यांवर परतावा दिला जातो, त्यामुळे ती एक मनी बॅक योजना ठरते. विशेषतः मध्यम व उच्च उत्पन्न असलेले गुंतवणूकदार, जे लाँग टर्म विमा कवचासोबत फायनान्शियल सिक्युरिटी शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे.

विमा रक्कम आणि प्रीमियम भरायची पद्धत

  • किमान विमा रक्कम: १ कोटी रुपये

  • किमान प्रीमियम: अंदाजे ₹९४,००० वार्षिक, जो ४ वर्षे भरावा लागतो.

  • प्रीमियम भरण्याचे पर्याय: मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक

  • कमाल विमा रक्कमेवर कोणतीही मर्यादा नाही

पात्रता आणि पॉलिसीची मुदत

  • किमान वय: १८ वर्षे

  • कमाल वय (पॉलिसी कालावधीवर अवलंबून):

    • १४ वर्षांची योजना – कमाल वय ५५ वर्षे

    • १६ वर्षांची योजना – कमाल वय ५१ वर्षे

    • १८ वर्षांची योजना – कमाल वय ४८ वर्षे

    • २० वर्षांची योजना – कमाल वय ४५ वर्षे

मनी बॅक आणि परिपक्वता लाभ

पॉलिसी मुदत मनी बॅक टप्पे परतावा (मूळ रकमेच्या %)
१४ वर्षे १०वे व १२वे वर्ष ३०% + ३०%
१६ वर्षे १२वे व १४वे वर्ष ३५% + ३५%
१८ वर्षे १४वे व १६वे वर्ष ४०% + ४०%
२० वर्षे १६वे व १८वे वर्ष ४५% + ४५%

शिल्लक रक्कम परिपक्वतेच्या वेळी एकरकमी स्वरूपात दिली जाते.

अतिरिक्त लाभ:

  1. कर्जाची सुविधा – किमान एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि किमान एक प्रीमियम भरल्यानंतर, ग्राहकांना काही अटींसह पॉलिसीवर आधारित कर्ज मिळू शकते.

  2. गंभीर आजार लाभ (Critical Illness Benefit) – गंभीर आजाराचे निदान झाल्यास विमा रकमेच्या १०% रक्कम एकरकमी दिली जाते.

  3. डेथ बेनिफिट – पॉलिसी कालावधीत विमाधारकाच्या मृत्यू झाल्यास, नॉमिनीला हमी रक्कम आणि बोनस दिला जातो.

  4. पॉलिसी सरेंडर सुविधा – निश्चित कालावधीनंतर पॉलिसी सरेंडर करता येते आणि सरेंडर व्हॅल्यूवर आधारित रक्कम मिळते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *