SIP म्हणजे काय?
SIP (Systematic Investment Plan) म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये निश्चित कालावधीसाठी नियमित गुंतवणूक करण्याची योजना. यामध्ये गुंतवणूकदार दरमहा, आठवड्याला किंवा दररोज ठराविक रक्कम गुंतवू शकतात. शेअर बाजारातील चढ-उतार असूनही, SIP हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी एक लोकप्रिय मार्ग मानला जातो.
SIP च्या तारखेनं परताव्यावर परिणाम होतो का?
SIP च्या तारखेचा परताव्यावर फारसा परिणाम होत नाही, असे बाजारतज्ज्ञांचे मत आहे. म्युच्युअल फंडात मिळणारा परतावा हा गुंतवणूक किती काळ बाजारात राहतो यावर अवलंबून असतो, एखाद्या विशिष्ट तारखेला पैसे गुंतवल्याने मोठा फरक पडत नाही.
संशोधन काय सांगतं?
गेल्या अनेक वर्षांतील संशोधनानुसार, SIP ची विशिष्ट तारीख निवडल्याने परताव्यात फारसा फरक पडत नाही. महिन्याच्या १ तारखेला, १५ तारखेला किंवा २५ तारखेला गुंतवणूक केली तरी अखेरच्या परताव्यात फारसा बदल होत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कुठलीही तारीख निवडण्याऐवजी सातत्यपूर्ण गुंतवणुकीवर भर द्यावा.
लांब कालावधी महत्त्वाचा आहे
SIP च्या यशस्वीतेसाठी तारखेपेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक अधिक महत्त्वाची आहे. गुंतवणूक जितक्या जास्त काळासाठी असेल, तितका Compounding चा फायदा होतो आणि बाजारातील चढ-उतार मॅनेज करता येतात. त्यामुळे तारखेबाबत चिंता करण्याऐवजी नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीवर भर द्यावा.
मंथली, वीकली आणि डेली SIP – कोणता पर्याय चांगला?
- डेली SIP: रोज गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे, परंतु यामुळे फारसा फायदा होत नाही.
- वीकली SIP: आठवड्यातून एकदा गुंतवणूक केली जाते, ज्यामुळे बाजारातील चढ-उतार कमी प्रमाणात लागू होतात.
- मंथली SIP: हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. १० वर्षांच्या सरासरी परताव्याचा अभ्यास केल्यास, मंथली SIP हा सर्वाधिक फायदेशीर ठरतो.
तुम्ही काय करावं?
- तारखेबाबत चिंता करू नका, तुमच्या सोयीसाठी एक तारीख निवडा.
- नियमितपणे गुंतवणूक करा, बाजारातील चढ-उताराचा दीर्घकालीन प्रभाव लक्षात ठेवा.
- दीर्घ मुदतीसाठी SIP चालू ठेवा, कारण मोठा परतावा हा कालांतरानेच मिळतो.
- बाजारातील घसरणीचा फायदा घ्या, कमी किमतीत अधिक युनिट्स खरेदी करणे शक्य होते.