टाटा मोटर्सची टाटा पंच ही सध्या भारतीय बाजारात एक लोकप्रिय कार ठरली आहे. तिची मजबूत बांधणी, आकर्षक लुक आणि परवडणारी किंमत यामुळे ग्राहकांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. जर तुम्ही टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या बजेटचा विचार करून डाउन पेमेंटसह कार खरेदी करायची असेल, तर या ऑफरमुळे तुम्हाला कार घेणे आणखीन सोपे होईल.(Tata Punch)
किती असेल मासिक EMI?
सध्या टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत ₹6.20 लाख आहे, तर ऑन-रोड किंमत सुमारे ₹7.23 लाख होते. जर तुम्ही ₹2 लाखांचे डाउन पेमेंट केले, तर उर्वरित ₹5,23,760 कर्जाच्या रकमेवर 9% वार्षिक व्याजदराने 5 वर्षांसाठी EMI फक्त ₹8,730 असेल.
टाटा पंच इंजिन आणि फीचर्स
- इंजिन: 1.2-लिटर, 3-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन
- पॉवर: 87 बीएचपी
- टॉर्क: 115 एनएम
- गिअरबॉक्स: 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT पर्याय
-
का खरेदी करावी टाटा पंच?
- सुरक्षितता: 5-स्टार सेफ्टी रेटिंग
- मायलेज: उत्तम इंधन कार्यक्षमता
- डिझाइन: कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश लुक