CIBIL Score Increase Tips:- CIBIL स्कोअर तपासणे अनेक कर्जदारांसाठी महत्त्वाचे आहे.परंतु यासंबंधी अनेक गैरसमज देखील आहेत. अनेक जण असा समज करतात की वारंवार क्रेडिट स्कोअर तपासल्याने त्यावर नकारात्मक परिणाम होतो. मात्र हा परिणाम कसा होतो आणि तो कधी लागू होतो हे समजून घेण्यासाठी हार्ड चौकशी आणि सॉफ्ट चौकशी यांच्यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
हार्ड इन्क्वायरी म्हणजे काय?
जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देण्याआधी तुमचा CIBIL स्कोअर तपासते.तेव्हा ती प्रक्रिया हार्ड चौकशी म्हणून ओळखली जाते. जर तुम्ही अनेक बँकांकडे एकाच वेळी कर्जासाठी अर्ज केला आणि त्या सर्वांनी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला,
तर तुमच्या CIBIL स्कोअरवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. यामुळे स्कोअर काही गुणांनी घसरू शकतो, कारण वारंवार कर्जासाठी अर्ज करणे आर्थिक अस्थिरतेचे लक्षण मानले जाते. याशिवाय, या चौकशीचा तपशील तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये नमूद केला जातो. त्यामुळे भविष्यातील कर्ज मंजुरीवरही परिणाम होऊ शकतो.
सॉफ्ट इन्क्वायरी म्हणजे काय?
दुसरीकडे, सॉफ्ट चौकशीचा तुमच्या CIBIL स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर स्वतःच अॅप किंवा वेबसाइटवरून तपासला, तर ते सॉफ्ट चौकशी म्हणून गणले जाते. ही प्रक्रिया केवळ तुमच्या माहितीसाठी असते आणि बँक किंवा वित्तीय संस्थांना ती दिसत नाही. त्यामुळे, तुमचा स्कोअर प्रभावित होत नाही. मात्र, सतत स्कोअर तपासण्याची सवय ठेवू नये, कारण आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन आवश्यक असतो.
CIBIL स्कोअर किती वेळाने तपासावा?
हा प्रश्न अनेकांना पडतो. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, क्रेडिट स्कोअर ३ ते ६ महिन्यांच्या अंतराने तपासणे योग्य असते. हे तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करण्यात मदत करू शकते. तसेच, जर तुम्ही कोणतेही नवीन कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमचा स्कोअर तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला अनावश्यक हार्ड चौकशीला सामोरे जावे लागणार नाही.
सिबिल स्कोर घसरण्याची कारणे?
CIBIL स्कोअर घसरण्याची अनेक कारणे असू शकतात. साधारणपणे ७५० पेक्षा जास्त स्कोअर हा चांगला मानला जातो. तर ३०० ते ७५० दरम्यान असलेला स्कोअर सुधारण्याची आवश्यकता असते. CIBIL स्कोअर कमी होण्यामागील प्रमुख कारणांमध्ये वेळेवर कर्जाचा हप्ता न भरणे, क्रेडिट कार्डचे देयक थकवणे,
कमी कालावधीत अनेक कर्ज अर्ज करणे, तसेच जास्त प्रमाणात क्रेडिट वापरणे यांचा समावेश होतो. तसेच जर तुम्ही कोणाच्या कर्जाचे हमीदार बनला असाल आणि त्या व्यक्तीने कर्जफेड वेळेवर केली नाही, तर तुमच्या CIBIL स्कोअरवरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
म्हणूनच तुम्ही तुमच्या आर्थिक शिस्तीवर लक्ष केंद्रित करून आणि वेळेवर देयके भरून तुमचा CIBIL स्कोअर चांगला ठेवू शकता. नवीन कर्ज घेताना योग्य नियोजन करा आणि अनावश्यक हार्ड चौकशी टाळा. तसेच CIBIL स्कोअर तपासणे अनेक कर्जदारांसाठी महत्त्वाचे आहे, परंतु यासंबंधी अनेक गैरसमज देखील आहेत. अनेक जण असा समज करतात की वारंवार क्रेडिट स्कोअर तपासल्याने त्यावर नकारात्मक परिणाम होतो. मात्र, हा परिणाम कसा होतो आणि तो कधी लागू होतो हे समजून घेण्यासाठी हार्ड चौकशी आणि सॉफ्ट चौकशी यांच्यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.