Red Section Separator

बिबी निंबाळकर : भाऊसाहेब बाबासाहेब निबाळकर यांनी 1948 साली महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफीमध्ये काठियावाड विरुद्ध 443 धावांची नाबाद खेळी केली होती.

Cream Section Separator

पृथ्वी शॉ : मुंबईचा सलामीवीर पृथ्वीने गुवाहाटी येथे आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात ३८३ चेंडूत ३७९ धावा केल्या होत्या.

संजय मांजरेकर : टीम इंडियाचा माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी वानखेडे स्टेडियमवर 1991 मध्ये हैदराबादविरुद्ध मुंबईकडून 474 चेंडूत 377 धावांची खेळी केली होती.

एमव्ही श्रीधर : हैदराबादचा फलंदाज मातुरी वेंकट श्रीधरने 1994 मध्ये हैदराबादकडून आंध्र प्रदेशविरुद्ध 523 चेंडूत 366 धावा केल्या होत्या.

विजय मर्चंट : भारताचे माजी कसोटीपटू विजय मर्चंट यांनी 1943 मध्ये महाराष्ट्राविरुद्ध मुंबई संघासाठी नाबाद 359 धावांची खेळी केली होती.

व्हीव्हीएस लक्ष्मण : भारताचा माजी स्टार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने 2000 साली हैदराबादसाठी कर्नाटकविरुद्ध 560 चेंडूत 353 धावांची खेळी केली होती.

चेतेश्वर पुजारा : टीम इंडियाचा नवा भिंत चेतेश्वर पुजाराने 2013 साली सौराष्ट्रसाठी कर्नाटक विरुद्ध 427 चेंडूत 352 धावांची खेळी केली होती.

स्वप्नील गुगल : महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगलने वानखेडे स्टेडियमवर 2016 मध्ये दिल्लीविरुद्ध 521 चेंडूत नाबाद 351 धावा केल्या होत्या.