Red Section Separator

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी 2022 च्या वर्षातील ICC पुरुष T20 संघाची यादी जाहीर केली.

Cream Section Separator

या यादीत 11 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

या भारतीय खेळाडूंमध्ये भारतीय फलंदाज विराट कोहली, 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव आणि T20 कर्णधार हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे ICC ने 2022 मध्ये या 11 सदस्यीय संघाची निवड केली आहे.

विराट कोहलीच्या 2022 मधील कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने एकूण 20 सामने खेळले आणि या सामन्यांमध्ये कोहलीने 781 धावा केल्या.

सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये एकूण 31 सामने खेळले आणि 187.43 स्ट्राइक रेटच्या सरासरीने एकूण 1164 धावा केल्या.

हार्दिक पांड्याने 2022 मध्ये 27 सामने खेळले, ज्यात त्याने 145.91 च्या सरासरीने 607 धावा केल्या.

याशिवाय इंग्लंडचा जोस बटलर, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स, पाकिस्तान-झिम्बाब्वेचा खेळाडू सिकंदर रझा आणि इतर खेळाडूंना या यादीत स्थान मिळाले आहे.