Red Section Separator

मध : रात्री एक कप दुधात एक चमचा मध टाकून प्या. मधाच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते.

Cream Section Separator

रोज मधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि पोट साफ होते.

पपई : पिकलेली पपई दिवसातून एकदा खावी. बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर.

अंजीर : कोरडे अंजीर रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेवर गुणकारी आहे.

मनुका : मनुका काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते पाण्यातून काढून खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

लिंबू : रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.

आले : सर्दीसारख्या अनेक समस्या दूर करण्यासोबतच आले बद्धकोष्ठतेची समस्याही दूर करते.

आल्याचे सेवन केल्याने स्नायूंना आराम मिळतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आले फायदेशीर आहे.