Red Section Separator

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. घरामध्ये वास्तूचे नियम नीट पाळले जात नसतील तर सकारात्मक ऊर्जेच्या जागी नकारात्मक ऊर्जा जास्त येते.

Cream Section Separator

घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढल्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

वास्तुशास्त्रात सांगितलेले काही उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे घरात धन, सुख आणि समृद्धी वाढते.

आज आम्‍ही तुम्‍हाला वास्‍तुशी संबंधित अशा काही चुका सांगणार आहोत, ज्‍यामुळे धनहानी होण्‍याची शक्‍यता असते.

घराच्या उत्तर दिशेला फ्रीज, आरओ, पाण्याच्या बाटल्या यांसारखी कोणतीही पाण्याची वस्तू ठेवू नका. यामुळे घरातील धनाची हानी होते.

शास्त्रानुसार घराची दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. वास्तूनुसार, पाण्याशी संबंधित कोणताही शोपीस चुकूनही घराच्या दक्षिण दिशेला ठेवू नये.

गडद रंगाचा पेंट घरात चुकूनही करू नये. घरात जास्तीत जास्त हलक्या रंगाचे पेंट असावेत.

वास्तूनुसार घरामध्ये काटेरी झाडे ठेवू नयेत. घरामध्ये काटेरी वनस्पती किंवा कोणतीही काटेरी वस्तू असल्यास ती काढून टाका.

वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार घरामध्ये चुकूनही झाडू तिजोरीजवळ ठेवू नये. असे केल्याने धनहानी होण्याची शक्यता वाढते असे मानले जाते.