Red Section Separator

गेल्या अनेक दशकांमध्ये शिवसेनेने एक प्रादेशिक पक्ष म्हणून देशाच्या राजकारणात ठसा उमटवला आहे.

Cream Section Separator

19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली.

शिवसेनेने 1967 साली ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीतून राजकारणात इंट्री केला.

शिवसेनेने 1967 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला.

1969 साली महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन निर्माण झालेल्या पेचप्रसंगात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली.

कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने उडी घेतली. यात शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले.

मुंबई महानगरपालिकेच्या १९७१ साली झालेल्या निवडणुकीत सत्ता मिळवली. त्यामुळे महापौर खुर्चीवर डॉ. हेमचंद्र गुप्ते हे बसले.

शिवसेनेच्या गुप्ते यांच्यानंतर अनेक महापौर मुंबईत झाले.

काही महापौरांना काँग्रेसचा तर काही महापौरांना भाजपाचा पाठिंबा मिळाला.