Electric car : पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

वास्तविक जगभरात इलेक्ट्रिक कारची क्रेझ वाढत आहे. ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक कारपैकी एक कार ग्राहकांना इतकी आवडली की काही तासांतच हजारो युनिट्सचे बुकिंग झाले. या कारची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्हाला 610 किमीची रेंज देते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hyundai Ioniq 6 इलेक्ट्रिक कारच्या प्री-सेल्सच्या पहिल्या दिवशी केलेल्या बुकिंगची संख्या 37000 च्या पुढे गेली आहे. कंपनीला यासाठी 37,446 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. प्री-ऑर्डरच्या बाबतीत त्याने Kia EV 6 ला मागे टाकले आहे.

Hyundai Ioniq 6 तपशील

Hyundai Ioniq 6 आणि या वर्षी जुलैमध्ये झालेल्या बुशन मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. त्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये जवळपास 31 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जर ते भारतात आयात करून विकले गेले तर त्याची किंमत 60 लाखांच्या जवळपास असेल. इलेक्ट्रिक सेडानमध्ये दोन बॅटरी व्हेरियंट उपलब्ध आहेत.

यात पहिला 53 kWh आणि दुसरा 77.4 kWh बॅटरी पॅक आहे. कंपनीचा दावा आहे की ते एका पूर्ण चार्जवर 610 किमी पर्यंत धावू शकते. या कारमध्ये तुम्हाला दोन ड्रायव्हर ट्रेन मिळतात. यामध्ये तुम्हाला सिंगल मोटर आणि रिअल व्हील ड्राइव्ह असलेले पहिले मॉडेल मिळेल.

तर दुसऱ्या मॉडेलमध्ये ड्युअल मोटर आणि ऑल व्हील ड्राइव्हचा पर्याय देण्यात आला आहे. याचे टॉप मॉडेल तुम्हाला 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 5 सेकंदात पकडू शकते. यामध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंगचाही सपोर्ट मिळतो. हे फक्त 18 मिनिटांत 10 ते 80% पर्यंत रिचार्ज करू शकते.

इलेक्ट्रिक सेडानची लोकांमध्ये खूप क्रेझ आहे. आता या इलेक्ट्रिक कार्स ऑटोमोबाईल क्षेत्राचे भविष्य आहेत. येत्या काही दिवसांत इंधन भरणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद होतील. जगातील अनेक नामांकित कंपन्यांनी 2035 पर्यंत त्यांच्या इंधनावरील कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.