Electric Scooter :- पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली आहे.

Tata Motors, Mahindra, MG Motors आणि Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत. दरम्यान जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे.

भारतीय बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चढ्या किमतीमुळे अनेकांना हव्या असतानाही त्या विकत घेता येत नाहीत. नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यास काही प्रमाणात कचरतात.

आज आम्‍ही तुम्‍हाला भारतीय बाजारपेठेत उपलब्‍ध असल्‍या काही सर्वोत्कृष्‍ट इलेक्ट्रिक स्‍कुटरची माहिती देणार आहोत, ज्यामध्‍ये तुम्‍हाला खूप कमी बजेटमध्‍ये लाँग ड्राईव्‍ह रेंजसह अनेक आधुनिक फीचर्स प्रदान केले आहेत.

इव्होलेट पोनी ईझेड इलेक्ट्रिक स्कूटर:
Evolet Pony कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर EZ भारतीय बाजारपेठेत खूप पसंत केली जाते. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात ₹ 39,541 च्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 80 किमीपर्यंत चालवता येते.

यामध्ये कंपनीने 250 वॅटची मोटर बसवली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने ताशी 25 किमीचा टॉप स्पीड दिला आहे. इव्होलेट पोनी ईझेड 8 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.

अँपिअर V48 इलेक्ट्रिक स्कूटर:
Ampere V48 ही बाजारातील बजेट विभागातील सर्वोत्तम स्कूटरपैकी एक आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात ₹ 37,790 च्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 50 किलोमीटरपर्यंत चालवता येते. यामध्ये कंपनीने BLDC तंत्रज्ञानावर आधारित 250 वॅटची मोटर बसवली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला 25 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देखील देण्यात आला आहे.

उजास eZy इलेक्ट्रिक स्कूटर:
Ujaas eZy भारतीय बाजारपेठेत ₹ 31,880 च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये 48V आणि 26 Ah बॅटरी लावली आहे आणि तुम्हाला यामध्ये 250W ची मोटर देखील देण्यात आली आहे. सामान्य चार्जरने, या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी 6 ते 7 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 60 किलोमीटरपर्यंत चालवता येते.