Mhlive24 टीम, 2 ऑक्टोबर 2020 :- भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द घडवणारा एम. एस. धोनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. धोनी हा असा खेळाडू आहे की तो अनेकांच्या गळ्यातील ताईद आहे.
सध्या आयपीएल मध्ये धोनीच्या चाहत्यांचा जलवा पाहून हे लक्षात येतच असेल. महेंद्रसिंग धोनीने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेत आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.
आता धोनी आता एका नव्या इनिंगसाठी आणि नव्या विश्वात वेगळ्या कारकिर्दीसाठी सज्ज झाला आहे. माहीची पत्नी साक्षी हिनं याबाबतची आनंदाची बातमी दिली.
क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आता मनोरंजन जगतात पदार्पण करत आहे. एका वेब सीरिजच्या निर्मितीच्या निमित्तानं धोनी आणि त्याची पत्नी दोघंही ही नवी जबाबदारी पार पाडणार आहेत.
साक्षीनं या बाबतची माहिती देत ‘द रोअर ऑफ द लायन’च्या वेळीच मनोरंजन जगतात पदार्पण करण्याची ही योग्य वेळ असल्याचा आपण विचार केल्याचं तिनं सांगितलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही साक्षीनं ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवत तिनं चाहत्यांचं प्रेम आणि सदिच्छांचीच आपल्याला गरज असल्याचं म्हटलं. याआधी त्याने २०१९ मध्ये ‘द रोअर ऑफ द लायन’ची निर्मिती केली होती.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर