Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

आयपीएल प्ले-ऑफमध्ये खेळणार ‘ह्या’ टीम ; जाणून घ्या वेळापत्रक आणि फायनलला कोण जाणार याविषयी

Mhlive24 टीम, 4 नोव्हेंबर  2020 :- आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगलाच रंगला. कोरोनाच्या गर्तेत उशिरा सुरु झालेला आणि प्रेक्षकांविना अनेक नियमांत खेळाला गेलेला हा हंगाम आता शेवटच्या टप्प्याकडे आला आहे.

Advertisement

आता प्ले-ऑफचं होणार असून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बँगलोर या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. यंदाच्या मोसमातल्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. मुंबईने 14 पैकी 9 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.

Advertisement

तर दिल्लीच्या टीमने 14 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 6 मॅच हरल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हैदराबाद, बँगलोर आणि कोलकाता या तिन्ही टीमनी 7 पैकी 7 सामने जिंकले, पण नेट रनरेटमुळे या टीम तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिल्या.

Advertisement

कोन जाणार फायनलला ? :- पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्यामुळे मुंबई आणि दिल्लीचा फायदा होणार आहे. कारण प्ले-ऑफच्या मॅचमध्ये पराभव झाला, तरी त्यांना फायनलला पोहोचण्याची दुसरी संधी मिळणार आहे.

Advertisement

प्ले-ऑफमध्ये मुंबईचा सामना दिल्लीशी होणार आहे, या मॅचमध्ये विजयी झालेली टीम फायनल गाठेल, तर हैदराबादची लढत बँगलोरशी होईल.

Advertisement

हैदराबाद आणि बँगलोर यांच्यात पराभूत झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तर जिंकलेली टीम मुंबई आणि दिल्ली यांच्यात पराभूत झालेल्या टीमसोबत खेळेल. या सामन्यात विजय मिळवलेली टीम फायनलला पोहोचेल.

Advertisement

 वेळापत्रक

Advertisement
  • 5 नोव्हेंबर- मुंबई विरुद्ध दिल्ली- क्वालिफायर-1, दुबई
  • 6 नोव्हेंबर- हैदराबाद विरुद्ध बँगलोर- एलिमिनेटर, अबु धाबी
  • 8 नोव्हेंबर- क्वालिफायर-2, अबु धाबी
  • 10 नोव्हेंबर- फायनल, दुबई

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement