Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

सचिन तेंडुलकरने ‘ह्या’ खेळाडूबाबत केले होते ‘हे’भाकीत; तंतोतंत खरे झाले

Mhlive24 टीम, 31 ऑक्टोबर 2020 :-आयपीएलचा १३वा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी आजवरचा सर्वात खराब असा ठरला. प्रत्येक हंगामात किमान प्ले ऑफमध्ये पोहोचणारा हा संघ या वर्षी मात्र गुणतक्त्यात अखेरच्या स्थानावर आहे. पण गेल्या दोन सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे.

Advertisement

या दोन्ही सामन्यात सुपर किंग्जने नव्या युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. गेल्या दोन सामन्यात चेन्नईकडून अर्धशतकी खेळी करून विजय मिळून देणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे सर्व जण कौतुक करत आहे.

Advertisement

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात केकेआरने चेन्नईसमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. ऋतुराजने 53 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 72 रन केले. त्याने टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सामना सुरू होण्यापूर्वीच गायकवाडबाबत अंदाज वर्तविला होता. सचिन म्हणाला की, गायकवाड लांब खेळी करण्साठी बनला आहे. चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर म्हणाला की,

Advertisement

‘मी त्याचा फारसा खेळ पाहिला नाही. पण मी जे पाहिले त्यावरुन तो एक उत्कृष्ट फलंदाज दिसतो आहे. त्याने उत्कृष्ट क्रिकेट शॉट्स खेळले आणि सुधारणा केली.

Advertisement

जेव्हा एखादा फलंदाज योग्य क्रिकेट शॉट्स खेळण्यास सुरूवात करतो, बॉल कव्हर किंवा मिड विकेटच्या वरुन किंवा थेट गोलंदाजाच्या डोक्यावरुन खेळतो. तेव्हा कळतं की, हा खेळाडू लांब खेळीसाठी बनला आहे.’

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li