Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

पी. व्ही. सिंधूचा सर्वांना धक्का ; म्हणाली “मी निवृत्त होतेय…”

Mhlive24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- भारताची ऑलम्पिक पदक विजेती पी. व्ही सिंधू हिनं ‘मी निवृत्त होतेय’ अशी पोस्ट टाकत सर्वांनाच धक्का दिला आहे.

Advertisement

सोशल मीडियावर सिंधूनं तीन पानं पोस्ट करताना पहिल्या पेजवर निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. सिंधूच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं आहे. खरं तरं सिंधूनं बॅडमिंटनमधून संन्यास घेतला नाहीय.

Advertisement

पण करोना महामारीच्या जनजागृतीसाठी हा I retire वाला मार्ग अवलंबला आहे. तिने बॅडमिंटनला अलविदा केलेले नाही तर तिने कोरोनामुळे तयार झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणाला निवृत्त केले आहे. ती नव्या जोमाने, नव्या झुंजार वृत्तीने आशिया ओपनसाठी पुन्हा एखदा कोर्टवर उतरणार आहे.

Advertisement

ती कोरोनाच्या भयाला निवृत्त करणार आहे आणि आपणही योग्य ती काळजी घेऊन जगभरातून कोरोना हद्दपार करावा अशी तिची अपेक्षा आहे. सिंधूनं पहिल्या पानावर म्हटलेय की, ‘डेनमार्क ओपन अखेरचा स्ट्रॉ होता.

Advertisement

मी निवृत्ती घेतली आहे.’ त्यानंतर पुढील पानात सिंधूनं लिहिलेय की, ‘गेल्या काही दिवसांपासून मनात उठणाऱ्या वादळाबद्दल बोलायचा विचार करत होते. त्यासोबत तोडगा काढताना संघर्ष होतो. पण आज माझ्या मनातील भावना मी इथं लिहून, “आता बस्स झालं…” ते सांगत आहे.

Advertisement

कदाचीत ही पोस्ट अखेरपर्यंत वाचल्यानंतर तुम्ही माझ्या समर्थनार्थ असाल अशी आशा आहे. ‘ सिंधूनं शेवटच्या पानात म्हटले की, ‘सध्या परिस्थितीत असलेल्या अशांतीच्या भावनेतून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी या नकारात्मकता, सततचं भय आणि अनिश्चितत्‍तेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li