Mhlive24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट अर्थात बायोपिक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत असून ती भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे.
या चित्रपटात परिणीती कशी दिसेल? याचा एक फोटो सायनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये परिणीती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे.
“माझी डुप्लिकेट पाहा”, असं म्हणत सायनाने ट्विट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सायना नेहवालचे चाहते हा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
भारतीय सिनेसृष्टीत सायनाशिवाय येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर