Success Story : जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी योग्य नियोजन आखून अहोरात्र काबाडकष्ट केले तर निश्चितच ती गोष्ट साध्य केली जाऊ शकते. कोणत्याही क्षेत्रात 100 टक्के क्षमतेने काम केल्यास यशाच्या गिरिशिखरावर पोहोचता येते.
आज आपण अशाच एका महिला उद्योजकाविषयी (successful businessmen) जाणून घेणार आहोत ज्यांनी व्यवसायाच्या (business news) क्षेत्रात पुरुषांना देखील लाजवल आहे. मित्रांनो आज आपण ज्या महिलेच्या यशोगाथेविषयी (successful person) जाणून घेणार आहोत त्यांनी उधारीच्या 300 रुपयांनी आपला व्यवसाय (business success story) सुरू केला होता आणि आजच्या घडीला करोडो रुपयांचे साम्राज्य त्यांनी निर्माण केल आहे.
मित्रांनो आज आपण मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीजच्या मालकिण (business idea) रजनी बेक्टरची यशोगाथा जाणून घेणार आहोत. रजनीताई यांनी खूप समर्पण आणि परिश्रम घेऊन आपली आवड जोपासली आणि आज त्यांची कंपनी करोडोची उलाढाल करणारी कंपनी बनली आहे.
बिस्किटे आणि केक बनवण्याची त्यांची कला त्यांना एक दिवस एका मोठ्या कंपनीचा मालक बनवेल याची रजनी बेक्टर यांनी कल्पनाही केली नसेल. परंतु रजनीताई यांनी आजच्या घडीला जे स्वप्नात देखील बघितलं नसेल ते सत्यात उतरवून दाखवल आहे. 50 हून अधिक देश आणि मॅकडोनाल्ड, केएफसी, पिझ्झा हट आणि बर्गर किंग सारख्या मोठ्या फास्ट फूड ब्रँडना देखील त्यांनी सेवा दिली आहे.
रजनी यांनी सुरुवातीला आपल्या एका ओळखीच्या माणसाकडून 300 रुपये उसने घेऊन ओव्हन विकत घेऊन बिस्किटे बनवण्याचे काम सुरू केले होते, त्यानंतर 1978 मध्ये रजनी बेक्टर यांनी 20 हजारांचे कर्ज घेऊन आईस्क्रीम बनवण्याचे युनिट सुरू केले. त्यानंतर रजनीने या युनिटमध्ये बिस्किट आणि ब्रेड बनवण्यास सुरुवात केली. त्याची बिस्किटे आणि आईस्क्रीम बनवण्याची ही कला लोकांना आवडली.
रजनीने आपल्या स्वयंपाकघरातून बिस्किटे आणि आईस्क्रीम बनवण्याचे काम सुरू केले होते, ते पाहता पाहता एका मोठ्या कारखान्यात पोहोचले. तेव्हापासून रजनी बेक्टर क्रेमिका फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याची सहयोगी कंपनी मिसेस बेक्टर फूड्स स्पेशालिटीज देखील चालवत आहेत. रजनी बेक्टरची ही कंपनी क्रेमिका ब्रेड सप्लायर चेनमधील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
क्रेमिका त्याच्या विक्रीतील 35 टक्के कमाई आघाडीच्या ब्रँडना ब्रेड आणि बेस पुरवून करते. रजनी बेक्टर पती आणि मुलांसह ही कंपनी चालवत आहेत. रजनी बेक्टरने त्यांच्या पॅशनला अनुसरून एकट्याने हे काम सुरू केले असेल, पण आज हजारो लोक तिच्या कंपनीत काम करत आहेत. निश्चितच रजनी ताईंचे हे यश इतरांना प्रेरणा देणार आहे.