Success Story : लेका, कौतुक कराव तेवढं कमीच…! अवघ्या 13 व्या वर्षी बिजनेसला सुरवात, अन बिजनेसची उलाढाल 100 कोटींच्या घरात, वाचा ही भन्नाट यशोगाथा

Success Story : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वयाचं बंधन नसतं. डोनाल्ड ट्रम्प आपल्या राजकारणाची सुरुवात वयाच्या सत्तराव्या वर्षी करतात आणि महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (Successful Person) बनतात. मुंबईच्या एका तेरा वर्षाच्या मुलाने देखील बिजनेस मध्ये यशस्वी होण्यासाठी वयाचं बंधन नसतं हे अधोरेखित केल आहे.

मुंबईचा तीलक मेहता (Tilak Mehta Success Story) या तेरा वर्षीय मुलाने मुलं ज्या वयात मुलं खेळण्यात आणि बागडण्यात व्यस्त असतात त्या वयात चक्क 100 कोटींची कंपनी बनवली आहे.

विशेष म्हणजे त्याच्या कंपनीत दोनशेहून अधिक लोकांना त्याने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण तीलक मेहता (Successful Businessmen) यांच्या यशोगाथा विषयी सविस्तर जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

वडिलांच्या थकव्यामुळे व्यवसायाची कल्पना (Business Idea) सुचली

वडिलांच्या थकव्यातून टिळक मेहता यांना त्यांच्या व्यवसायाची (Business News) कल्पना सुचली. खरे तर तिलकचे वडील विशाल मेहता संध्याकाळी ऑफिसमधून यायचे तेव्हा ते खूप थकायचे आणि त्यामुळे तिलक कधीच वडिलांना बाहेर जायला किंवा काहीही आणायला सांगू शकत नव्हते.

अनेक वेळा तिलक आपल्या वडिलांना वही आणि पेन आणण्यास देखील सांगत नव्हते. वडील थकलेले असत म्हणून तिलकला त्यांना त्रास देणे योग्य वाटत नसे. यानंतर तिलक मेहता यांना वाटले की बहुतेक लोक अशा समस्येला सामोरे जात असतील, कारण कार्यालयातून थकून परतलेले त्यांचे वडील पाहून त्यांची मागणी पुढे ढकलली जात असेल.

मग काय यानंतर त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली आणि त्यांनी कुरियर सेवा सुरू केली. त्यांच्या वडिलांनीही यात मदत केली आणि तिलकला बँक अधिकारी घनश्याम पारेख यांना भेटायला लावले, त्यांनी व्यवसायाची कल्पना ऐकून नोकरी सोडली आणि तिलकसोबत व्यवसायात सामील होण्याचा निर्णय घेतला.

100 कोटींचा टर्नओवर आणि 200 लोकांना रोजगार

तिलकने आपल्या कंपनीचे नाव ‘पेपर अँड पेन्सिल’ ठेवले आणि घनश्याम पारेख यांना कंपनीचे सीईओ बनवले. सुरुवातीला तिलक याच्या कंपनीने बुटीक आणि स्टेशनरीच्या दुकानातून छोट्या ऑर्डर घेतल्या. त्यासाठी मुंबईतील डब्बेवाल्यांची मदत घेऊन माल पोहोचवण्यात आला.

लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी आपले काम वाढवले. तिलकच्या कंपनीत आज 200 हून अधिक लोक काम करतात आणि त्यांच्याशी सुमारे 300 डबेवाले जोडले गेले आहेत. तिलकच्या कंपनीची वार्षिक उलाढाल आता 100 कोटी रुपये आहे, जी त्यांना 200 कोटींच्या पुढे पोहोचवायची आहे.

निश्चितच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वयाचं बंधन नसतं जर व्यक्तीमध्ये एखादी गोष्ट अचिव्ह करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी कष्ट करण्याची हिम्मत असेल आणि योग्य प्लॅनिंग असेल तर कोणीही कोणत्याही वयात काहीही करू शकतो.