Success story : पोलिस पुत्राने सर केला यूपीएससीचा गड ; पाचव्या प्रयत्नात मिळाली 466 वी रँक

MHLive24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- वडील पोलीस खात्यात कॉन्स्टेबल असल्याने लहानपणापासूनच मनावरती आपणही पोलीस खात्यात जाऊन सेवा करावी असे स्वप्न उराशी बाळगले होते. (Success story: Son of police UPSC In the fifth attempt, he got 466th rank)

लहानपणी बाळगलेले स्वप्न आज त्याचे साकार होताना दिसत आहे. वडील एएसआय म्हणून नुकतेच निवृत्त झाले. तर मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा गड सर केला.

त्याला आयपीएस रैंक मिळेल याची शंभर टक्के खात्री आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केले. श्रीकांत रामराव मोडक (Shrikant Ramrao Modak) असे या युवकाचे नाव असून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 466 रँक मिळवली आहे.

Advertisement

श्रीकांत मोडक याचे दहावीपर्यंत शिक्षण पुसद येथील कोषटवार महाविद्यालयातून झाले. तर बारावी ही लातूर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातून केले.

त्यानंतर इंजिनिअरिंग पुणे येथील सिंहगड महाविद्यालयातून तर एमटेक गुजरातमधील गांधीनगर येतून त्याने केले. लहानपणापासूनच हुशार असल्याने स्कॉलरशिपवरतीच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.

कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता केवळ सेल्फ स्टरी स्टडीज आणि लायब्ररीमध्ये अभ्यास करून यश मिळवले आहे.श्रीकांत याने खासगी कंपनीत नोकरीवर असताना परीक्षा दिली. त्यात यश आले नाही.

Advertisement

आणि त्याने नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे यूपीएससीचा अभ्यास करण्याचे ठरविले. यवतमाळ येथे एकवर्षं तयारी केली. त्यानंतर थेट दिल्ली गाठून तयारीला लागला. आतापर्यंत चार वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली.

यात एक वेळ 3 गुणांनी मुलाखतीपासून वंचित राहिला. मात्र त्याने जिद्द सोडली नाही आणि पाचव्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि मुलाखती पर्यंत पोहचला. नुकत्याच लागलेल्या निकलमध्ये त्याला 466 रँक मिळाली. त्यामुळे आपल्याला आयपीएस हे कॅडर मिळेल असा त्याला ठाम विश्वास आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit
Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker