Success Story : अलीकडे सोशल मीडियाचा (Social Media) वापर खूपच वाढला आहे. लोक आता इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब यांसारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देश-विदेशात अनेक सोशल मीडिया स्टार देखील उदयास आले आहेत.
विशेषता युट्यूब वर व्हिडिओ बनवून अनेक लोक जगप्रसिद्ध झाले आहेत. आज आपण अशाच एका अवलियाची यशोगाथा (Youtube Success Story) जाणून घेणार आहोत ज्याने युट्युब वर व्हिडिओ बनवत वर्षाकाठी अकरा कोटी रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.
वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी या अवलियाने यूट्यूबच्या (Youtube) माध्यमातून करोडपती बनण्याचा प्रवास सर केला आहे. यामुळे सध्या या अवलियाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. ही कथा आहे चार्ली चांगची. त्याला खरं पाहता डॉक्टर व्हायचे होते. पण कदाचित नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यामुळे त्याला डॉक्टर होता आले नाही.
त्यानंतर त्यांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली. मात्र आता चार्ली दरवर्षी यूट्यूबवरून करोडो रुपये कमवत आहे. प्रश्न असा आहे की चार्ली त्याच्या व्हिडिओंमध्ये असं काय सादर करतो, ज्याने त्याला इतके पैसे मिळत आहेत. तर , मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की चार्ली (Successful Person) फायनान्शिअल ॲडव्हाइस आपल्या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून देत असतात. जे कि लोकांना खूपच आवडत आहे आणि युट्यूब मधून त्यांना यामुळे चांगली कमाई (Successful Businessmen) होत आहे.
कॉलेज सोडले बर :- त्याने 2014 मध्ये कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. खरे तर डॉक्टर व्हायचे होते, पण अनेक वैद्यकीय महाविद्यालयांनी त्याला नाकारले. चांग मूळचे कॅलिफोर्निया, यूएसए येथील आहेत. चार्लीने सुमारे पाच वर्षे मुलांना शिकवले. त्यानंतर मॉडेलिंग केले आणि स्वतःचा व्यवसायही केला. पण या सगळ्यातून त्याला मिळणारी रक्कम त्याच्यासाठी कमी होती.
मग काय युट्युब प्लॅटफॉर्म निवडले :- चार्लीला त्याच्या कामातून अपेक्षित असे पैसे न मिळाल्याने तो यूट्यूबकडे वळला. एका रिपोर्टनुसार, जेव्हा चार्लीचा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा त्याने स्वतःला YouTube Adsense साठी नोंदणीकृत केले, जेणेकरून त्याला चॅनलच्या माध्यमातून कमाई करता येईल. मग काय, त्याने युट्युब मोनेटाइज केल्यानंतर त्याला यूट्यूबवरून पैसे मिळू लागले.
गेल्या वर्षी 12 कोटी छापले:- चांगने 2021 मध्ये 12 कोटी रुपये कमावले. सध्या त्याचे YouTube वर 8.22 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याच्या कमाईने तो अतिशय आरामदायी जीवन जगतो. त्याचबरोबर चार्ली इंस्टाग्रामवरही सक्रिय आहे. त्यांच्याकडे सुपरकार आहेत. सुट्टीच्या दिवशी ते खूप पैसे खर्च करतात. चार्ली युट्युब व्यतिरिक्त अन्य व्यवसायात देखील सक्रिय आहेत. निश्चितच आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची धमक असेल तर कोणत्याही व्यवसायात यशाची गिरीशिखरे सहजरीत्या सर करता येतात.