बातमी अभिमानाची ! भारताला ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक निश्चित..

MHLive24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने चांगली कामगिरीरी करत इतिहास रचला आहे. त्याकझाकिस्तानच्या सनायेव नूरिस्लामला धोबीपछाड देत रवीने सेमीफायनल सामन्यात ५७ किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवलाय.

या विजयासह त्यानं आपलं रौप्य पदकही निश्चित केलं आहे.मुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. आता अंतिम सामन्यात रवीकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.

सुशीलकुमारनंतर कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवणारा रवी दुसरा भारतीय आहे. याआधी सुशीलकुमारने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. याशिवाय योगेश्वर दत्त (२०१२) आणि साक्षी मलिक (२०१६) यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे.

Advertisement

रवी उपांत्य फेरीत ८ गुणांनी पिछाडीवर होता. वाटलं की तो आता पराभूत होईल. पण १ मिनिट शिल्लक रवीने कझाकिस्तान कुस्तीपटूला पराभवाची धूळ चारली.पहिल्या फेरीत २-१ अशी आघाडी घेणारा रवी दुसऱ्या फेरीत नुरिस्लामच्या बाजीत अडकला. परिणामी, नुरिस्लामने एकानंतर एक असे २-२ गुण मिळवले. त्यामुळे त्याने ९-२ गुणांची मुसंडी मारली.

यानंतर, रवीला सामन्यात पुनरागमन करणं कठीण होतं. पण त्याने हिम्मत हारली नाही. रवि पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या इराद्याने नुरिस्लामला भीडला. रचिच्या डोक्यात कसल्याही परिस्थितीत प्रतिस्पर्धी नुरिस्लामला चीतपट करायाचा हाच विचार सुरू होता.

त्यामुळे इच्छाशक्ती आणि आपल्या आजवरच्या अनुभवाच्या जोरावर याने एकापाठोपाठ एक डाव टाकून बचाव आणि आक्रमक खेळाच्या जोरावर ३ गुण मिळवले.

Advertisement

त्यामुळे गुणांची आघाडी ५-९ आली. आता फक्त एक मिनिटाचा खेळ शिल्लक होता. रवीने पहिल्या स्टेकवर नुरिस्लामचा पाय पकडला आणि त्याला उलथवून टाकलं. त्यामुळे रविला आणखी २ गुण मिळाले. त्यानंतर त्याने सामना जिंकून इतिहास रचला.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker