Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ ! ‘या’ ठिकाणी सोयाबीन साडे सहा हजारावर ; इतर ठिकाणी वाढतील का दर, वाचा सविस्तर
Soybean Bajarbhav : सोयाबीन हे संपूर्ण भारत वर्षात उत्पादित केले जाणार एक प्रमुख नगदी पीक आहे. या पिकाची मध्य प्रदेशात सर्वाधिक शेती केली जाते. भारतातील एकूण सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर मध्य प्रदेश राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक लागतो. आता मध्य प्रदेश राज्यातून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
मित्रांनो मध्यप्रदेश राज्यात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. मध्यप्रदेश मध्ये सोयाबीन तब्बल साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. खरं पाहता महाराष्ट्रात सोयाबीन ला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत आहे.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
मध्यप्रदेश मध्ये देखील सोयाबीनच्या बाजार भावात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आता सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. आज मध्यप्रदेश मधील बडनगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोयाबीनला तब्बल सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे.
या बाजार समितीमध्ये आज शेतकरी श्री राहुल यांच्या 40 पोती सोयाबीनची खरेदी एजंट श्री. ऋषभ यांनी 6500/क्विंटल दराने केली, जी मागील दिवसांच्या किमतीपेक्षा जास्त आहे. निश्चितच यामुळे मध्यप्रदेश राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.
मात्र असे असले तरी आपल्या राज्यात अजूनही सोयाबीनचा बाजार भावात वाढ पाहायला मिळत नाही. सध्या राज्यात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव पुरता संकटात सापडला आहे. जाणकार लोकांच्या मते, या हंगामात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण बाजार भाव मिळणार आहे.
अशा परिस्थितीत सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च कशा पद्धतीने काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा झाला आहे. गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजारभाव मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र शेतकरी बांधवांनी चांगला भाव मिळेल या अनुषंगाने केलेली सोयाबीनची लागवड आता त्यांच्यासाठी तोट्याची ठरत आहे.