Raosaheb Danve : राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भरसभेत दाखवले असे काही….

MHLive24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- पुण्यातील एका कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली.यावेळी भाषण करताना रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी त्यांच्या पाटलेल्या शर्टचा किस्सा सांगितला. त्यांच्यासोबत मंचावर खासदार संभाजीराजे छत्रपती होते.

मी सगळी पदं उपभोगली. मला मतदारसंघातील लोकांनी भरभरुन पदं दिली, मी केंद्रात तीनवेळा मंत्री जरी झालो असलो तरी साधेपणा सोडला नाही. काल मी हैद्राबादला आमच्या एका मित्राकडे गेलो होतो.

मोठा माणूस आहे तो, तेव्हा तो म्हणाला, दादा तुम्ही खादीचा शर्ट घ्या. का तर म्हणाला तुमचा शर्ट फाटलाय. नवीन शर्ट घ्या. मी म्हटलं शर्ट फाटलाय म्हणून काय फरक पडला?

Advertisement

आता इथे तुम्ही सगळे पुण्याची माणसं आहेत, यात कुणी फाटक्या शर्टचा माणूस येऊन बसलाय का मला सांगा बरं.

घरातील बाईने तुमच्या तुम्हाला सांगितलं असेल, तुमचं शर्ट फाटलंय, बदलून घ्या. असा कुणी माणूस आहे का फाटलेला शर्टाचा.. बघा माझा शर्ट इथे फाटलाय, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी भर मंचावर त्यांचा फाटलेला शर्ट दाखवला.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीवेळचाही किस्सा सांगितला. निवडणुकी दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्याचे प्रमाणपत्र घेण्यावेळी शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर माझ्यासोबत होते.

Advertisement

त्यावेळी लोणीकर म्हणाले, एकही सभा न घेता इतक्या मोठ्या फरकाने दानवे निवडून कसे आले. त्यावर खोतकर म्हणाले लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल, शेवटचं मत देऊन टाकावं म्हणून निवडून आले असतील, असा किस्सा दानवेंनी सांगितला.

तीन प्रभाग रचनेसंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, भाजपला फायदेशीर होईल अशी 3 चा प्रभाग रचना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे का करत आहेत हे तुम्ही शिवसेनेलाच विचारा, आम्ही सध्या प्रबळ विरोधकांच्याच भूमिकेत आहोत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit
Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker