मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खळबळजनक वक्तव्य ! चर्चांना उधाण …

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील उपस्थित भाजपा नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

व्यासपीठावर भाजपा नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असा भाजपा नेत्यांचा उल्लेख केला.

मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला एकाच मंचावर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना टोले लगावले.

Advertisement

जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.

व्यासपीठावरचे आजी माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचं स्वागत असं विधान केले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर येत्या काळात शिवसेना-भाजपा पुन्हा युती झाली तर राज्यात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे चालतील का? असं विचारण्यात आलं असता दानवे यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

“आधी सगळं जमून येऊ देत. मग पुढे चर्चा होत राहतील. शिवसेना आणि भाजपा पूर्व मित्र होते. आता पुन्हा मित्र होण्याची शक्यता आहे”, असं रावसाहेब दानवे म्हणाले. शिवसेना आमचा समविचारी पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेनं युतीचा विचार केला तर निश्चितच भाजपा त्याचं स्वागत करेल, असंही ते म्हणाले.

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker