RBI Recruitment 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदासाठी होणार भरती, जाणून घ्या कसा करावा अर्ज

RBI Recruitment 2022 :- तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. RBI सेवा मंडळाने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

कोणती पदे रिक्त आहेत ?
विधी अधिकारी – ग्रेड बी – 2 पोस्ट
मॅनेजर (टेक्निकल- सिव्हिल) – 6 पोस्ट
मॅनेजर (टेक्निकल- इलेक्ट्रिकल) – 3 पोस्ट
लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड ‘ए’ – 1 पोस्ट
आर्किटेक्ट ग्रेड ‘ए’ – 1 पोस्ट
क्युरेटर – पूर्णवेळ करार – कोलकाता संग्रहालय – 1 पोस्ट

RBI च्या या रिक्त पदासाठी इच्छुक उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना आरबीआयच्या http://www.rbi.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अन्य कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे अधिसूचनेत म्हटले आहे. उमेदवार फक्त बँकेने दिलेल्या अर्ज लिंकवरून यासाठी अर्ज करू शकतात.

Advertisement

RBI ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व नियम आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. यासाठी ते आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा या लिंकवर क्लिक करू शकतात.

महत्वाच्या तारखा-
RBI भर्ती 2022 च्या या भरतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून सुरू होत आहे. या पदांसाठी उमेदवार 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, या पदांसाठी लेखी परीक्षा 6 मार्च 2022 रोजी होणार आहे.

अर्ज शुल्क-
RBI च्या अधिसूचनेनुसार, RBI भर्ती 2022 साठी अर्ज करण्यासाठी, GEN/OBC/EWS उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PwBD उमेदवारांना यासाठी 100 रुपये भरावे लागतील.

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker