सिने अभिनेते रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ला अलिबागची भुरळ,तब्बल 90 गुंठे जागा खरेदी करून झाले अलिबागकर, चाहत्यांची उसळली गर्दी

MHLive24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोकणातील मनमोहक सागरी किनारे, निसर्ग सौन्दर्याची भुरळ कुणाला न पडावी तर नवल. सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग कपूर आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. (Ranveer Singh Kapoor and Deepika Padukone are now Alibagkar)

अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे 90 गुंठे एने (NA) जागा 22 कोटीला खरेदी केली आहे त्या जागेच्या काही कागदोपत्री कामाच्या पुर्तेसाठी ते आज आलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात आले होते. यावेळी या जोडीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली.

खरंतर सिनेसृष्टीमधील सिनेकलाकार नेहमीच आपल्या राहणीमानासाठी सतत चर्चेत असतात त्यांच राहणीमान हे अतीशय उच्च दर्जाच असंत ते सर्वसामान्यांना भुरंळ घालणार असतं मग ते राहत असणाऱ्या मुंबई मधील उच्चभ्रू सोसायटी असो वा सुट्ट्या घालविण्यासाठी त्यांनी घेतलेले रीसॉर्ट.

Advertisement

मात्र धकाधकीच्या दुनियेतून बाहेर पडून रिलॅक्स होण्यासाठी शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी आपल्या हक्काचा निवास असावा अशी इच्छा प्रत्येकाची असते.अलिबाग , मुरुड व अन्य पर्यटनस्थळी अनेक अभिनेते, राजकीय मंडळी यांचे फार्म हाऊस, घरे थाटली आहेत.

आजकाल सर्व कलाकारांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत आहे. येथिल जागेचे भाव गगनाला भिडले आहेत, मात्र निसर्गचा सहवास मिळावा यासाठी ते हवी तेवढी किंमत द्यायला तयार असतात .

अशातच आता रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोणने चक्क 90 गुंठे जागाच अलिबागमध्ये घेतली आहे या जागेत दोन बंगले असून काही नारळ सुपारीची बाग असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

आणि या जागेचे रजिस्टर आज हे पती-पत्नी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात आले होते. मात्र या दोघांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker