Nashik Pune Expressway : अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच नासिक-पुणे औद्योगिक एक्सप्रेसवेचा श्रीगणेशा

Nashik Pune expressway: पश्चिम महाराष्ट्रातील (Pune) पुणे, अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक (Nashik) या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यासंदर्भात एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता पुणे आणि नाशिक ही दोन शहरे महाराष्ट्रासाठी औद्योगिक दृष्ट्या खूपच महत्त्वाची आहेत.

आता या दोन शहरांबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो या दोन शहरांमधील दळणवळण सोयीचे घडवून आणण्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक महत्त्वाचा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.

लवकरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 180 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग (Highway) तयार केला जाणार आहे. आता समृद्धी महामार्ग देखील आपल्या अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे नाशिक या 180 किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गावर काम सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

या औद्योगिक महामार्गामुळे (Expressway) पुणे अन नाशिक या दोन शहरांमधील अंतर लक्षनीय कमी होणार असून यामुळे या दोन शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठे सोयीचे होणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, महारेलच्या माध्यमातून पुणे ते नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग उभारण्याचे उद्दिष्ट आहे. खरं पाहता हा नियोजित रेल्वेमार्ग रेल कम रोड राहणार आहे. अशा परिस्थितीत या रेल कम रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर यालाच समांतर असा पुणे नासिक द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. या महामार्गामुळे पुणे आणि नाशिक औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांच्या विकासाला चालना मिळणार असून याचा अहमदनगर जिल्ह्याला देखील मोठा फायदा होणार आहे.

हा महामार्ग पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन शहरांना जोडणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला एक नवीन गती मिळणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. खरं पाहता, ही तीनही शहर औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत आणि चांगल्यापैकी विकसित देखील आहेत. या महामार्गामुळे अहमदनगर, पुणे आणि नाशिक या तिन्ही शहरातील विकासाला अजूनच गती मिळणार आहे.

यामुळे उद्योग क्षेत्राला एक वेगळे वळण लाभणार असून शेती क्षेत्राला देखील याचा कुठे ना कुठे फायदा होणार आहे. मित्रांनो या मार्गासाठी डीपीआर तयार करणे हेतू 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता आता पुणे ते नाशिक या दोन शहरांदरम्यान प्रवास करण्यासाठी सद्यस्थितीला चार ते पाच तास लागत आहेत. मात्र या महामार्गाची उभारणी केल्यानंतर या दोन शहरांमधला प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण होणार आहे.

निश्चितच पुणे आणि नाशिक या दोन शहरादरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असून प्रवाशांचा अनमोल वेळ देखील वाचणार आहे. या महामार्गाबद्दल बोलायचं झालं तर हा महामार्ग पुण्याच्या रिंग रोड पासून सुरू होणार असून नासिक येथे सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे. हा सदर महामार्ग सहापदरी राहणार आहे. सुरत चेन्नई महामार्गाला सदर महामार्ग जोडला जाणार असल्याने पुणे ते सुरत प्रवास देखील सोपा होणार आहे.

मित्रांनो याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या वर्षभरात प्राप्त होणार आहे. निश्चितच येत्या काही दिवसात या महामार्गाला मूर्तरूप देण्यासाठी आराखडा तयार होणार आहे.

या महामार्गमुळे निश्चितच पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आणि उद्योग क्षेत्राला एक वेगळे वळण लाभणार आहे. यामुळे या तीन जिल्ह्यातील विकासाला परिणामी महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.