Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Nagpur Goa Expressway : नागपूर-गोवा महामार्ग खोलणार विकासाचे कवाड ! नागपूर ते गोवा अंतर अवघ्या 8 तासात होणार पार, वाचा या महामार्गाविषयी सविस्तर

Nagpur Goa Expressway : कोणत्याही विकसित देशाच्या विकासात रस्ते (Highway) महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विकसनशील देशाला देखील विकसित होण्यासाठी यथायोग्य दळणवळण व्यवस्था असणे आवश्यक असते.

जितकी देशाची दळणवळण व्यवस्था मजबूत असेल तितक्याच मजबुतीने देशाचा विकास शक्य आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने भारतमाला परियोजना अंतर्गत तीन हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यास सुरुवात केली आहे. आता महाराष्ट्र राज्य शासन देखील राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

राज्य सरकार (State Government) आता पाच हजार किलोमीटर लांबीचे वेगवान महामार्ग विकसित करण्यासाठी कंबर कसणार आहे. यामध्ये नागपूर गोवा महामार्गाचा देखील समावेश राहणार आहे. या महामार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गपेक्षा (Expressway) लांब राहणार आहे.

आपल्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग अर्थातच समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची लांबी 701 किलोमीटर एवढी आहे. तर या नागपूर गोवा महामार्गाची लांबी तब्बल 760 किलोमीटर एवढी राहणार आहे. मित्रांनो आता नागपूर ते गोवा प्रवास करण्यासाठी 20 ते 22 घंटे लागत असतात.

मात्र या महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर हे अंतर मात्र 8 ते 10 तासात पार होणे शक्य होणार आहे. निश्चितच नागपूर ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या महामार्गामुळे मोठा फायदा होणार असून या द्रुतगती महामार्गामुळे विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला देखील द्रुतगती लाभणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या महामार्गाविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो राज्य सरकार महाराष्ट्राच्या विकासाला नविन पंख देण्यासाठी पाच हजार किलोमीटरचे द्रुतगती महामार्ग राज्यात विकसित करणार आहेत. या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून 5267 किलोमीटरच्या महामार्ग निर्माण करण्याचा प्रकल्प राज्यात सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन प्राधिकरणाकडून सदर महामार्गाचे निर्माण केले जाणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या कडून 4,217 किलोमीटरचे महामार्ग तयार केले जाणार आहे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 1057 किलोमीटरचे महामार्ग तयार करणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या यांच्याअंतर्गत 15 प्रकल्प केले जाणार आहेत. त्यामध्ये मुंबई पुणे महामार्गचा देखील समावेश होता. या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून जनतेच्या सेवेसाठी सुरू झाला आहे.

तसेच 701 किलोमीटर लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्गचे काम सध्या प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात हा महामार्ग देखील जनतेच्या सेवेसाठी खुला होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून तयार केल्या जाणाऱ्या 15 प्रकल्पापैकी अजून तेरा प्रकल्प सुरू झालेले नाहीत.

यामध्ये नागपूर-गोवा या 760 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा देखील समावेश आहे. मित्रांनो, विदर्भाचा परिणामी महाराष्ट्राचा विकास व्हावा या अनुषंगाने मुंबई-नागपुर महामार्ग बांधकाम सुरू करण्यात आले असून हा महामार्ग येत्या काही दिवसात तयार होणार आहे. त्याचप्रमाणे नागपूरला किंवा विदर्भाला कोकणाशी थेट कनेक्ट केले जावे या अनुषंगाने नागपूर गोवा महामार्ग नियोजित करण्यात आला आहे.

नियोजित नागपूर-गोवा महामार्ग विषयी थोडक्यात

हा होऊ घातलेला महामार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामुळे विदर्भ आणि कोकण मधील दळणवळण सुरळीत होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे चार विभाग जोडणारा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून उदयास येणार आहे. सातशे साठ किलोमीटर लांबीचा हा होऊ घातलेला महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार असून सिंधुदुर्ग गोवा सीमेवरील पत्रादेवी या ठिकाणी संपणार आहे.

हा महामार्ग वर्धा येथून सुरू होऊन नागपूरला समृद्धी महामार्गा द्वारे जोडला जाणार आहे. नागपूर गोवा महामार्ग हा विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे.

यामुळे हा महामार्ग न केवळ विदर्भासाठी मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा महामार्ग म्हणून उदयास येणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. या होऊ घातलेल्या महामार्गासाठी 75 हजार कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. खरं पाहता नागपूर ते गोवा हे अंतर आत्ता पार करण्यासाठी 21 ते 22 तास लागतात आणि एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करावा लागतो. या महामार्गा नंतर नागपूर पासून केवळ आठ ते दहा तासात गोवा गाठता येणे शक्य होणार आहे.

महामार्गाला देण्यात आलं हे नाव

मित्रांनो नागपूर महामार्गाला ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात आल आहे. तसेच या होऊ घातलेल्या नागपूर गोवा महामार्गाने देखील शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग असं नाव देण्यात आल आहे. हा महामार्ग तीन शक्तीपीठाना जोडून असल्याने याला शक्तीपीठ असं नाव देण्यात आल आहे.

हा महामार्ग महालक्ष्मी तुळजाभवानी आणि पत्रादेवी अशा तीनही शक्तीपिठाना जोडून आहे. एवढेच नाही तर या महामार्गामुळे देवदर्शन देखील सोयीचे होणार आहे. रेणुका माता, सेवाग्राम आश्रम, औंढा नागनाथ, नांदेड गुरुद्वारा, सिद्धेश्वर, परळी-वैजनाथ, पंढरपूर, तुळजाभवानी, महालक्ष्मी आणि पत्रादेवी अशा धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास या मार्गाने अधिकच सोपे आणि सोयीचे होणार आहे. त्यामुळे या महामार्गाला धार्मिक महत्त्व देखील लाभणार आहे.

महामार्गाबाबत आत्ताची वस्तुस्थिती काय

मित्रांनो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा आगामी दीड ते दोन वर्षात या महामार्गाला सुरुवात करण्याचा मानस आहे. जाणकार लोकांच्या मते, अजून एक ते दीड वर्षात समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे अशा परिस्थितीत या महामार्गाला एक ते दीड वर्षात सुरुवात केली जाऊ शकते. शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुढे सरसावले असून या अनुषंगाने सल्लागार नियुक्त करण्यासाठी मागील आठवड्यात निविदा देखील देण्यात आली आहे.

सल्लागार नियुक्त झाल्यानंतर सल्लागारांकडून या महामार्गा चा आराखडा तयार केला जाईल त्यानंतर याची मंजुरी घेतली जाईल. मंजुरी घेतल्यानंतर बांधकामासाठी आवश्यक ती प्रक्रिया किंवा मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेतली जाईल. म्हणजेच या सर्व प्रक्रियेला अजून दोन वर्षाचा कालावधी असून दोन वर्षानंतर शक्तीपीठ महामार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. काम सुरू झाल्यानंतर जवळपास सात वर्षांनी हा महामार्ग जनतेच्या सेवेसाठी खुला होऊ शकतो.