Mumbai Nagpur Expressway : स्वर्गीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबाबत (Samruddhi Mahamarg) एक महत्त्वाचा अपडेट हाती आल आहे. महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी दिशा देणारा महामार्ग (Expressway) म्हणून ओळखला जाणारा 701 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग (Highway) लवकरच जनतेच्या सेवेत हजर होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शिंदे-फडणवीसची जोडी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीनिमित्त (Diwali Festival) एक मोठी खुशखबर देणार आहे.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे मुंबई-नागपुर एक्स्प्रेसवे (Samruddhi Mahamarg) अर्थातच समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर (Nagpur) यांच्यामधील विकासाचा एक दुवा बनणार आहे. या महामार्गामुळे राजधानी मुंबई (Mumbai) आणि उपराजधानी नागपूर यांच्या मधील प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. खरे पाहता या दोन राजधान्यांना जोडणारा हा महामार्ग 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि माँ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला आहे.
हा महामार्ग देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पपैकी एक असल्याचा दावा जाणकार करतात. खरं पाहता या महामार्गामुळे राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या फायदा होणार आहे. प्रत्यक्षरीत्या हा महामार्ग 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे तर या महामार्गामुळे इतर चौदा जिल्ह्यांना देखील अप्रत्यक्षरीत्या लाभ मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला एक नवीन वळण लागणार असून उद्योग क्षेत्राच्या विकासाला हातभार लागणार आहेत. 55 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा प्रतिक्षित महामार्गबाबत आताच एक महत्त्वाची अपडेट आली आहे.
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण या दिवाळीत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या लोकार्पण सोहळ्याबाबत राज्य शासनाकडून गोपनीयता राखली जात आहे. खरं पाहता अनेकदा या महामार्गाच्या लोकार्पणाचा ची तारीख जाहीर होऊन देखील लोकार्पण सोहळा पार पडत नसल्याने यावेळी गोपनीयता राखली जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमधील एका प्रतिष्ठित अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीच्या शुभमुहूर्तावर करण्याचे नियोजन सरकार दरबारी आले गेले आहे.
दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून लोकार्पणाचाची वेळ आणि तारीख निश्चित झाल्यानंतर याबाबत अधिकारीक घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. दरम्यान अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी लोकार्पण सोहळा पार पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच पंतप्रधानांनी तारीख निश्चित केल्यानंतर लोकार्पणाबाबत आधिकारिक घोषणा होणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आल आहे. यामुळे सरकारकडून लोकार्पणाच्या अनेकदा तारखा जाहीर झाल्या.
मात्र, अनेकदा कामाचा दर्जा काम सुरू असताना झालेले अपघात त्यामुळे या महामार्गाचा लोकार्पण सोहळा नेहमीच लांबणीवर पडला आहे. दरम्यान या वेळी योग्य ती गोपनीयता राखली जात असून पंतप्रधान कार्यालयाकडून लोकार्पणासाठी तारीख आणि वेळेची पुष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची अधिकारी घोषणा केली जाणार आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, या महामार्गाची एकूण सोळाशे 1699 ठिकाणी छोटी-मोठी बांधकाम आहेत.
यातील जवळपास चौदाशे पेक्षा अधिक ठिकाणची बांधकाम पूर्ण झाली आहेत. म्हणजेच हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून लोकार्पण लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. एकंदरीत 31 जुलै 2015 रोजी विधानसभेत वर्तमान उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या समृद्धी महामार्ग निर्मितीची घोषणा आता येत्या काही दिवसात सत्यात उतरणार आहे. एकंदरीतच काय येत्या काही दिवसात समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 120 किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.