MHLive24 टीम, 05 एप्रिल 2022 :- Ration Card : गरजू लोकांसाठी रेशन कार्ड म्हणजे एक महत्वाचे दस्तावेज आहे. लोकांना रेशन कार्डवर दरमहिना धान्य मिळत असते, हे असे कागदपत्र आहे ज्याच्या मदतीने गरिबांना स्वस्तात रेशन दिले जाते. मात्र आता रेशन कार्डच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
अशा परिस्थितीत तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तर ते त्वरित बनवू शकता. घरी बसून किंवा सरकारी कार्यालयात न जाता हे काम करायचं असेल तर ते शक्य आहे. चला जाणून घेऊया घरी बसल्या बसल्या रेशनकार्ड कसे बनवायचे.
प्रथम कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे जाणून घ्या
घरी बसून रेशनकार्ड बनवायचे असेल तर काही कागदपत्रे लागतील. याशिवाय तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटोही आवश्यक असतील.
इतर कागदपत्रांची यादी येथे आहे
आधार कार्ड
वीज बिल
उत्पन्न प्रमाणपत्र
तुमच्या पासबुकची पहिल्या पानाची प्रत
गॅस कनेक्शन किंवा इतर तत्सम तपशील.
आता शिधापत्रिकेसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
सर्व राज्यांनी रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आम्ही तुम्हाला दिल्लीमध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा ते सांगणार आहोत.
प्रथम दिल्लीमध्ये ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या. दिल्लीत राहणारे लोक यासाठी प्रथम https://nfs.delhigovt.nic.in/ वर जा.
त्यानंतर अर्ज करण्यासाठी पोर्टलवर लॉग इन करा.
त्यानंतर NFSA 2013 अंतर्गत अन्न सुरक्षेसाठी अर्जावर क्लिक करा.
त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
- 🤷🏻♀️ Mhlive24 आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit