LPG Cylinder Price :- LPG सिलेंडर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एलपीजी सिलेंडरच्या वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या किमती ह्या त्यांच्या आर्थिक बजेटच गणित ठरवत असतात.

मात्र सध्या किमतीबाबत परिस्थिती ही चिंताजनक आहे. दरम्यान अशातच आज LPG गॅस सिलिंडरचे नवीन दर जारी झाले आहेत. दरम्यान नवीन आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ केली आहे. गेल्या महिन्यात 22 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती,

तर व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला होता. ही वाढ घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये नाही तर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

कारण, अवघ्या 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते, तर 22 मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 249.50 रुपयांनी वाढून 2,253 रुपये झाली आहे.

यापूर्वी त्याची किंमत 2,003.50 रुपये होती. दुसरीकडे घरगुती एलपीजीच्या किमती न वाढल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 949.5 रुपये आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 976 रुपये, मुंबईत 949.50 रुपये आणि चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 965.50 रुपये आहे.