Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

LG ने लॉन्च केला जगातील पहिला ‘असा’ OLED TV, जाणून घ्या किंमत फिचर्स

0 0

MHLive24 टीम, 21 जून 2021 :-  सध्या टेक्नॉलॉजी जबरदस्त वाढली आहे. विविध गोष्टींमध्ये त्याचाच वापर केलंजातं आहे. टेक्नॉलॉजीने जीवनमान अत्यंत सुधारित झाले आहे.

आता याचा उपयोग, टीव्ही, स्मार्टफोन यांमध्ये केला जात आहे. त्यामुळे नवनवीन अपडेट्स आणि सुविधा मिळत आहेत. आता रविवारी एलजी इलेक्ट्रॉनिक्सने सांगितले की त्यांनी 83 इंचाचा ओएलईडी टीव्ही लाँच केला आहे. 83 इंचाच्या आकाराच्या डिस्प्लेसह ओएलईडी टीव्ही आनणारा एलजी हा पहिला टीव्ही निर्माता आहे.

Advertisement

83 सी 1 टीव्ही 4K रेझोल्यूशनसह हा इंडस्ट्रीतील सर्वात मोठा ओएलईडी टीव्ही आहे. एलजीचा 83 इंचाचा ओएलईडी टीव्ही, 83 सी 1 हा या महिन्यात प्रथम दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत उपलब्ध होईल. दक्षिण कोरियामध्ये त्याची किंमत, 9,630 डॉलर (सुमारे 7.14 लाख) ठेवली गेली आहे.

LG 83 C1 OLED TV ची खासियत :- नवीन टीव्ही एलजीच्या ओएलईडी टीव्ही लाइनअपचे विस्तार आहेत, ज्यात आधीपासून 48-इंच, 55-इंच, 65-इंच, 77-इंच आणि 88-इंच मॉडेल्स आहेत.

Advertisement

88 इंचाचे मॉडेल 8K रिजोल्यूशनसह येणारा टीव्ही आहे. एलजीच्या मते, 83 सी 1 मध्ये 4 के हाय फ्रेम टेक्नोलॉजी सह एडवांस फीचर्स आहेत, जी गेम खेळताना आणि खेळ पाहताना अधिक चांगला अनुभव देतात.

2021 च्या पहिल्या तिमाहीत एलजी ओएलईडी टीव्ही शिपमेंटमध्ये वाढ झाली आहे :- बाजार संशोधक ओमडियाच्या मते, एलजीची ओएलईडी टीव्ही शिपमेंट्स 2021 च्या पहिल्या तीन महिन्यांत 116 टक्क्यांनी वाढून 792,000 यूनिट ची नोंद झाली, जे पहिल्या तिमाहीतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

Advertisement

ओमडिआने यापूर्वी अंदाज वर्तविला होता की जागतिक ओएलईडी टीव्ही बाजार यावर्षी 5.8 मिलियन युनिटपर्यंत पोचेल, जो मागील वर्षी 3.65 मिलियन युनिट्स होता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement