‘ह्या’ बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 जुलैपासून लागू होणार ‘हे’ नवीन ग्राहक सेवा नियम

MHLive24 टीम, 12 जून 2021 :-  आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना आता दरवर्षी केवळ 20 पानांचे चेकबुक विनामूल्य मिळणार आहे. यानंतर प्रत्येक चेकसाठी ग्राहकांना पाच रुपये द्यावे लागतील. आतापर्यंत खाते उघडण्याच्या पहिल्या वर्षात बँक 60 धनादेशांची चेकबुक विनामूल्य देत आहे.

त्यानंतरच्या वर्षांमध्ये बँक 50 धनादेशाचे चेकबुक देते. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी ग्राहकाला 5 रु. द्यावे लागत होते. परंतु नव्या नियमानुसार आता मोफत चेकची मर्यादा 20 करण्यात आली आहे. त्यानंतर ते फ्री नसेल. नवीन नियम 1 जुलैपासून (2021) लागू होईल.

Advertisement

कॅश डिपोजिटच्या फ्री सुविधेचेही नियम बदलले :- ज्या ग्राहकांचे खाते ‘सबका सेव्हिंग्ज अकाउंट’ मध्ये आहे ते या नियमाच्या कक्षेत येणार नाहीत. त्यांना अमर्यादित विनामूल्य धनादेश मिळतील. हे शून्य शिल्लक खाते आहे. सर्वसमावेशक बँकिंगला चालना देण्यासाठी हे सुरू झाले आहे.

अर्ध-शहरी आणि ग्रामीण शाखांमध्ये सध्याच्या विनामूल्य सुविधा 7 आणि 10 वरून बँकेने ते क्रमश: 5-5 केले आहे. त्याचप्रमाणे सुपर सेव्हिंग प्लस खात्यासाठी अर्धशहरी व ग्रामीण भागातील बचत खात्यातील फ्री ट्रांजेक्शन सध्याच्या 10 व 12 वरून 8-8 पर्यंत कमी करण्यात आले आहेत.

Advertisement

लॉकर रेंट च्या सवलत नियमांत देखील बदल :- लॉकरच्या नियमातही काही बदल करण्यात आले आहेत. ज्युबिली प्लस ज्येष्ठ नागरिक खातेधारकाचे मासिक सरासरी शिल्लक 10 हजारांपेक्षा कमी असेल तर लॉकर भाड्यात कोणतीही सूट मिळणार नाही.

जर उर्वरित रक्कम वर्षभरात 10,000 ते 24,999 रुपयांपर्यंत राहिली तर लॉकर भाड्यात 10% सूट मिळेल. जर मासिक सरासरी शिल्लक 25,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर ही सूट 15 टक्के असेल.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit