स्पेशलमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळव्यातील भाषांतील काही ठळक मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळव्यातील भाषांतील काही ठळक मुद्दे

Related

Share

Mhlive24 टीम, 26 ऑक्टोबर 2020 :-आज दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं रोखटोख भाषण केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी टिककरांना चांगलेच खडेबोल सुनावले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

- Advertisement -सरकारी योजना, पैसा आणि शेती व आरोग्य विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बिहारच्या जनतेने प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावं, कोणाला करावं हे मी सांगणार नाही, फक्त डोळे उघडे ठेवून मतदान करा

तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही 808 एकर जंगल वाचवलं, एक नवा पैसाही खर्च न करता कारशेड उभारतोय

आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा

इथं काम करणारी पोरं महाराष्ट्राच्या मातीतली हवी

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय, मुंबईत यायचं आणि इथल्या मातेशी नमकहरामी करायची, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर मुख्यमंत्र्यांचा प्रहार

रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, आमचे जीएसटीचे पैसे मिळायलाच हवेत

– बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे??

देश संकटात आहे आणि भाजप राजकारण करतंय, हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही

सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेल गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी

देव, मंदिर, पूजा, अर्चा हे आमचं हिंदुत्व नाही, बाळासाहेबांनी सांगितलेलं आमचं हिंदुत्व

सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व

हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते

बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला, वाघ पाहून तो लपला, मुख्यमंत्र्यांची राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका

महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाराला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा

सरकार पाडण्याच्या अनेकजण तारीख पे तारीख देतात, मी आताही आव्हान देतो, सरकार पाडून दाखवाच… आम्ही खुर्चाला चिटकून बसणारे नाहीत. पण आमच्या वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवतो.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर