India Post Payments Bank मध्ये खाते आहे? मग तुमच्यासाठी महत्वाची बातमी

अनेक लोकांचे पोस्टामध्ये खाते आहे. विविध सुंदर योजना पोस्ट चालवत असल्याने याठिकाणी गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. आता  इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने बँकिंगमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे.

IPPB ने फिजिकल शाखांमध्ये रोख पैसे काढणे आणि जमा करण्यावर शुल्क बदलण्याचा निर्णय घेतला आहे.  हा  नवीन शुल्क 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.

पोस्टाने नोव्हेंबर 2021 मध्ये एक अधिसूचना जारी केली होती, ज्यात रोख पैसे काढणे आणि जमा करण्यावर शुल्कात बदल घोषित केले होते. नवीन शुल्काशी संबंधित संपूर्ण तपशील जाणून घ्या.

Advertisement

किमान शुल्क 25  रुपये
IPPBने नोव्हेंबर 2021 मध्ये जारी केलेल्या सूचनेनुसार, मूलभूत बचत खात्यासाठी, रोख पैसे काढण्याची विनामूल्य मर्यादा संपल्यानंतर  25 रुपये चार्ज आकारला जाईल. फ्री 4 व्यवहारांपर्यंत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा चार्जेस GST देखील ऍड होईल.

कॅश डिपॉझिट वर काय होणार ?
बचत (मूलभूत बचत खात्याव्यतिरिक्त) आणि चालू खात्यांसाठी, दरमहा रु. 25,000 पर्यंत रोख काढणे विनामूल्य आहे. मोफत मर्यादेनंतर, 0.50% रक्कम किंवा किमान रु.25 प्रति व्यवहार आकारले जातील. ही बाब आयपीपीबीच्या नोटीसमध्येही नमूद करण्यात आली आहे. तसेच, या खात्यांमध्ये दरमहा 10,000 रुपयांपर्यंतच्या रोख ठेवी मोफत आहेत. मोफत मर्यादेनंतर, मूल्याच्या 0.50 टक्के किंवा प्रति व्यवहार किमान 25 रुपये आकारले जातील.

अन्य बचत खाते ग्राहकांसाठी शुल्क
इतर बचत खाते ग्राहकांना आता 25,000 रुपयांपर्यंतच्या मोफत विथड्रॉल नंतर  0.50 टक्के रक्कम किंवा प्रति व्यवहार किमान 25 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे, कॅश डिपॉझिटवर  बचत खात्यातील ग्राहकांनी दरमहा 10,000 रुपयांपर्यंत मोफत ठेवीनंतर रक्कमेच्या 0.50 टक्के किंवा प्रति व्यवहार किमान 25 रुपये शुल्क भरण्यास तयार असले पाहिजे.

Advertisement

जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जाईल
आयबीबीपीने सांगितले की हे सर्व शुल्क जीएसटी किंवा लागू उपकर वगळता आहेत. म्हणजेच, तुम्हाला शुल्कावर सेस आणि जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल.

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker