Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Gold Price Update: सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! किमतीत मोठी घसरण, खरेदीसाठी गर्दी

Gold Price Update:  भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे यामुळे सराफ बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी सोने खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता उशीर करू नका.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज भारतीय सराफ बाजारात सोने सर्वोच्च पातळीवरून सुमारे 1,400 रुपयांनी स्वस्त  आहे.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बदल झाला आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात 440 रुपयांनी वाढ झाली आहे. यासोबतच 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 58,340 रुपये, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 53,440 रुपये नोंदवला गेला.

भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे नवीनतम दर 

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये आज 24  कॅरेट (10ग्रॅम) सोन्याचा भाव 52,285 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा (10ग्रॅम) भाव 47,927 रुपये नोंदवला गेला आहे. यासोबतच देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 58,570 रुपये, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 53,700 रुपये होता.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 58,420 रुपये होता, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 53,550 रुपये नोंदवला गेला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) दर 58,420 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) दर 53,550 रुपये होता. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) दर 58,420 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) दर आज 53,550 रुपये आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या

जर तुम्ही बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला मिस्ड कॉलवरून दराची माहिती घ्यावी लागेल. तुमच्या शहराची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर मेसेजद्वारे दराची माहिती दिली जाईल.