स्पेशलसरपंचकी मिळवली वाघानं, फॉर्च्युनर दिली दोस्तानं !

सरपंचकी मिळवली वाघानं, फॉर्च्युनर दिली दोस्तानं !

Related

Share

वाघोली : केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायत सरपंचपदी दत्तात्रय हरगुडे, तर उपसरपंचपदी सुरेखा बांगर यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सचिन हरगुडे व उपसरपंच अक्षदा हरगुडे यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्‍त झाली होती.

- Advertisement -

सरपंचपदावर दत्तात्रय हरगुडे यांची निवड होताच त्यांच्या मित्रांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच त्यांना तब्बल ४५ लाखांची कार भेट दिली.

- Advertisement -सरकारी योजना, पैसा आणि शेती व आरोग्य विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नवनियुक्त सरपंच यांचे समर्थक व कार्यकर्त्यांच्यावतीने निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

सरपंच नावाचा मोठा हार बनवून तो क्रेनच्या साह्याने उचलून धरण्यात आला. मित्र व समर्थक यांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण केली व गावातून मिरवणूक काढण्यात आली.

सर्वसामान्यकुटुंबातील दत्तात्रय मारुती हरगुडे यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्या मित्रांनी त्यांना सुमारे ४५ लाख रुपये किमतीची आलिशान कार भेट देत अनोखी मैत्री जपली.

यावेळी ग्रामसेवक प्रदीप ढवळे, अशोक शिंदे, बगाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गट
ज्ञानेश्‍वर कटके,

भाजप सरचिटणीस संदीप सातव, माजी सरपंच मिलिंद हरगुडे, गणेश ढोरे यांच्यासह केसनंदचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मला दिलेली कार मी गावाच्या सेवेसाठी वापरणार, असे सरपंच हरगुडे यांनी सांगितले.